spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नागपूरच्या बालसुधार गृहातून सहा विधिसंघर्षग्रस्त पळाले

नागपूरमधील पाटणकर चौक परिसरामध्ये असलेल्या महिला व बाल कल्याण विभागाच्या बालसुधार गृहातून (Bal Sudhar Gruh) सहा विधिसंघर्षग्रस्त सुरक्षारक्षकांवर हल्ला करून पळून गेले आहेत.

नागपूरमधील पाटणकर चौक परिसरामध्ये असलेल्या महिला व बाल कल्याण विभागाच्या बालसुधार गृहातून (Bal Sudhar Gruh) सहा विधिसंघर्षग्रस्त सुरक्षारक्षकांवर हल्ला करून पळून गेले आहेत. पळून गेलेल्या विधिसंघर्षग्रस्तांवर अनेक वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रविवारी दुपारच्या वेळेस काही लहान मुलांना थंडी निमित्त बाहेर बसवण्यात आले होते. त्यावेळी त्यातील सहा मुलांनी डाव साधत बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. पळून जाण्याआधी मुलांनी महिला सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर त्यांनी रिमांड होम आणि सीसीटीव्ही कॅमेराची तोडफोड केली. पळून गेलेली सर्व मुले ही सतरा वयोगटातील आहेत. पोलिसांनी या मुलांवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला आहे.

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या काळात पाटणकर चौक परिसरातील महिला व बाल कल्याण विभागाच्या बालसुधार गृहामध्ये दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक रित्या अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ताजी असतानाच याच रिमांड होम मधून ६ विधिसंग्रघर्षग्रस्त पळाले आहेत. यामुळे आता कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी सकाळी थंडी निमित्त या मुलांना बाहेर बसवण्यात आले होते. बाहेर ठेवण्यात आलेली सर्व मुले ही १७ वयोगटातील आहेत. येथील मुलांकडून रिमांड होममधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, यांसारखे प्रकार नेहमीच घडत असतात. त्यामुळे पळून गेलेले सर्व मुले अल्पवयीन असेल तरीसुद्धा कारागृहातील कैद्यांपेक्षा घातक आहेत. रिमांड होम असो किंवा बालसुधारगृह या सारख्या घटना नेहमीच घडत असतात. वारंवार घडत असलेल्या या घटनांमुळे कारागृहाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नागपुरातील पाटणकर चौक परिसरात असलेल्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या बालसुधार गृहामध्ये विविध गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या लहान बालकांचा समावेश आहे. रविवारी पळून गेलेली सहा मुले वेगवेगळ्या गुन्हयात सहभागी आहेत. यातील दोन जणांवर खुनाचा आरोप तर एकावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आणि बालकांच्या संदर्भातील कायदे कठोर नसल्यामुळे येथे अनेक प्रकार घडत आहेत. या घडलेल्या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी दोन पथक तयार करून मुलांचा शोध घेण्यात यात आहे.

हे ही वाचा:

जो पक्ष कुबड्या घेऊन उभे आहेत, त्यांनी ४५ जागांची भाषा करावी हे हास्यास्पद, संजय राऊत

POLITICS: प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी सोबत यावं- VIJAY WADETTIWAR

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss