Maharashtra news राज्यात पुणे, वरळीनंतर आज ‘या’ शहरात बंदची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Maharashtra news राज्यात पुणे, वरळीनंतर आज ‘या’ शहरात बंदची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या विरोधात स्थानिक संस्थानाकडून १६ डिसेंबर २०२२ आज सोलापूर बंदची (Solapur Bandh) हाक देण्यात आली आहे. श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने आज दुपारी २ वाजेपर्यंत सोलापूर बंद पुकारला आहे. हा बंद केवळ शांततेत होईल. या बंदमध्ये अनेक शाळा, महाविद्यालये, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार असल्याचा दावा मंडळाचे उत्सव अध्यक्ष शेखर फंड यांनी केला आहे. दरम्यान आज सकाळपासून सुरु होणारे सोलापुरातील बाजारपारठेतील व्यवहार ठप्प असल्याचं पाहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद आहि माहिती समोर येत आहे.

हेही वाचा : 

Avatar चित्रपट ‘दृश्यम 2’ची डिमांड करणार कमी?, केवळ ॲडव्हान्स बुकिंगच्या कलेक्शनमध्ये २० कोटींचा पल्ला पार

आज सोलापूरात पुकारलेल्या बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटासह विविध संघटना सहभागी होणार आहेत. तर या बंदमध्ये भाजपा, मनसे आणि शिंदे गटाचा सहभाग असणार नाही. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाकडून जिल्ह्याती तगडा बोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरामध्ये ९ पोलीस निरीक्षक, २७ सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक तसेच १५४ कर्मचारी, राखीव पोलीस दलाच्या ४ टीम, ९ स्ट्राईकिंग फोर्स तैनात करण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने शहराला छावणीचं स्वरुप आलं आहे.

Vijay Diwas 2022 १९७१ साली भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला,१४ दिवसाच्या युद्धानंतर पाकिस्तान आलं शरण

काल १५ डिसेंबर २०२२ रोजी महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी अजित पवार यांनी महामोर्चाबद्दल भूमिका मांडली. येत्या १७ डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे. महाविकास आघाडीची या मोर्चासाठी पूर्ण तयारी झालीय. विशेष म्हणजे या मोर्चासाठी (maha vikas aghadi morcha) आता महाविकास आघाडीकडून वातावरण निर्मिती केली जातेय. त्यासाठी महाविकास आघाडीने मोर्चा कशासाठी या मथळ्याखाली अनेक उत्तर स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलायय.

Corona virus चीनमधील वाढत्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येचं संपूर्ण जगापुढे टेन्शन

Exit mobile version