रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! क्यू आर कोड स्कॅन करा आणि रेल्वे तिकीटाची पेमेंट करा…

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! क्यू आर कोड स्कॅन करा आणि रेल्वे तिकीटाची पेमेंट करा…

भारतात व्यवहारासाठी सुरु करण्यात आलेल्या डिजिटल पेमेंटच्या सुविधांमुळे ऐतिहासिक क्रांती झाल्याचे पाहायला मिळत आहे. अगदी छोट्या दुकानांपासून ते भव्य शोरूम्सपर्यंत रोखीने व्यवहार करण्याऐवजी नागरिक आता युपीआय म्हणजेच ‘युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस’ चा सर्रास वापर करत आहेत. युपीआय या जलद आणि भरवशाच्या डिजिटल पेमेंटसेवेमुळे रोख व्यवहारांची गरज कमी होते. भारतात सुरु झालेल्या या आर्थिक व्यवहाराच्या क्रांतीचे जगभरात कौतुक केले जात आहे. अश्यातच आता रेल्वे विभागाकडूनही यादृष्टीने महत्वाचे पाऊल टाकण्यात आले असून आता सोलापूर रेल्वे विभागाने तिकीट काउंटर वर आता यूपीआय क्यू आर कोड ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

प्रवाश्यांना उत्तमोत्तम सेवा पुरविण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच सज्ज असते. नव्या तंत्रज्ञानाशी जुळते घेत सोलापूर रेल्वे विभागाने विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच आता क्यू आर कोड ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या सर्वच जण पैशाच्या देवाण घेवाण करता यूपीआय सुविधेचा वापर करत आहेत. तीच बाब लक्षात घेऊन सोलापूर रेल्वे विभागाने तिकीट काउंटर वर आता यूपीआय क्यू आर कोड ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

कोणताही प्रवासी जेव्हा रेल्वे स्थानकावर आरक्षित/अनारक्षित (जनरल) तिकीट काढण्यासाठी जाईल तेव्हा त्याच्या तिकिटाच्या रकमेचा क्यू आर कोड जेनरेट होईल आणि त्याने काढलेल्या तिकीटाची रक्कम त्याला आता एकच क्यू आर कोड स्कॅन करून पूर्ण करता येईल. पूर्वी पीओएस स्वॅप मशीन आणि कॅश अश्या दोन्ही स्वरूपात तिकिटाची रक्कम भरावी लागत होती त्यात प्रवाश्यांचा फार वेळ जात होता परंतु आता क्यू आर कोड स्कॅन मशीनमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होऊन त्यांना आपला प्रवास निश्चित करता येणार आहे.

येणाऱ्या काळात संपूर्ण सोलापूर रेल्वे विभागामध्ये सवं तिकीट काउंटर वर अश्या क्यू आर कोड सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या या रेल्वे सुविधेचा लाभ प्रत्येक प्रवाश्यांनी करावा असे आवाहन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केले आहे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version