Kartiki Ekadashi : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरला विशेष रेल्वे, मात्र परतीच्या पावसामुळे भाविकांनी फिरवली यात्रेकडे पाठ

Kartiki Ekadashi : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरला विशेष रेल्वे, मात्र परतीच्या पावसामुळे भाविकांनी फिरवली यात्रेकडे पाठ

राज्यभर यंदा परतीच्या पावसाने हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर या नुकसानीचे पंचनामे अजून सुरूच असल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्याने यंदा कार्तिकी यात्रेकडे पाठ फिरवली आहे. आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात अजूनही मोकळे रस्ते असून ज्या भक्तिसागरमध्ये जवळपास तीन लाखापेक्षा जास्त भाविक दरवर्षी निवास करतात. तिथे केवळ आज १ लाख ६८ हजार भाविकांच्या निवासाची नोंद झाली आहे. अजूनही जवळपास १८० प्लॉट मोकळे असल्याने या परिसरात यात्रेचे वातावरण देखील दिसत नाही.

आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, गुजरात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार?

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरला विशेष रेल्वे सोडण्यात येणार

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे ये-जा करणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेऊन मध्य रेल्वेतर्फे लातूर-पंढरपूर, पंढरपूर-मिरज आणि सोलापूर-पंढरपुरदरम्यान विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. लातूर-पंढरपूर गाडी नं. ०१४१९ ही विशेष रेल्वे ४, ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी लातूर येथून सकाळी साडेसात वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी दुपारी साडेबाराच्या सुमारास पोहोचेल. गाडी नं. ०१४२० ही विशेष रेल्वे ४, ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथून दुुपारी अडीच वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास पोहोचेल. ही रेल्वे हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डुवाडी आणि मोडनिंब या रेल्वे स्थानकांवर थांबेल.

आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, गुजरात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार?

गाडी नं. ०१४२१ ही विशेष रेल्वे पंढरपूर येथून ५, ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी बारा वाजता पोहोचेल. गाडी नं. ०१४२२ ही विशेष रेल्वे मिरज येथून ५, ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी संध्याकाळी पाचच्या सुमारास पोहोचेल. ही रेल्वे सांगोला, वसूड, जावळे, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सुलगरे आणि आरग या रेल्वे स्थानकांवर थांबेल.

व्यापाऱ्यांना मोठा फटका

दिवाळीच्या सुट्टीत रोज हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केल्याने यंदा दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात होणारी यात्रा विक्रमी होणार अशी अपेक्षा होती पण परतीच्या पावसाने वारकऱ्यांनी कार्तिकी यात्रेकडे पाठ फिरवल्याने व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसणार आहे.

हेही वाचा : 

मला वाद वाढवायचा नाही, त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही : बच्चू कडू

Exit mobile version