SSC & HSC Exam : दहावी बारावीच्या मुलांना परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ

SSC & HSC Exam : दहावी बारावीच्या मुलांना परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ

दहावी (SSC Board Exam) आणि बारावीच्या (HSC Board Exam) विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावी परीक्षेसाठी अर्ज (exam application from) दाखल करण्यासाठी बोर्डाकडून (board) मुदतवाढ करण्यात आली. त्यामुळे आता दहावी बोर्ड परीक्षेसाठी (SSC Board Exam) अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख (Last date) २५ नोव्हेंबर असणार आणि बारावी बोर्ड परीक्षेसाठी (HSC Board Exam) अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख (Last date) ३० नोव्हेंबर असणार आहे . तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून दहावी बारावीच्या मुलांना परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे या बद्दल सांगणार आहोत.

दहावी बोर्ड परीक्षेसाठी (SSC Board Exam) फॉर्म भरण्याची तारीख ही १० नोव्हेंबर होती. आता २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे. बारावी बोर्ड परीक्षेसाठी (HSC Board Exam) फॉर्म भरण्याची तारीख ही ४ नोव्हेंबर पर्यंत होती. आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या मुलांसाठी विलंब शुल्कासह परीक्षेसाठी अर्ज दाखल करता येणार आहे.

 

दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य मंडळी याने (Maharashtra State Congregation) दहावी आणि बारावीचे बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे दहावी बोर्डची परीक्षा ही २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या दरम्यान होणार आहे. आणि बारावी बोर्डची परीक्षा ही २१ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ या दरम्यान होणार आहे. तसेच हे संभाव्य वेळापत्रक असून निश्चित वेळापत्रक काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

दहावी बोर्ड परीक्षेचा संभाव्य सविस्तर वेळापत्रक

२ मार्च – प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा)
३ मार्च – द्वितीय वा तृतीय भाषा
६ मार्च – इंग्रजी
९ मार्च – हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
११ मार्च – संस्कृत, उर्दू ,गुजराती पाली ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
१३ मार्च – गणित भाग – १
१५ मार्च – गणित भाग २
१७ मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
२० मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
२३ मार्च – सामाजिक शास्त्र पेपर १
२५ मार्च – सामाजिक शास्त्र पेपर २

बारावी परीक्षेचे संभाव्य सविस्तर वेळापत्रक जाहीर

२१ फेब्रुवारी – इंग्रजी
२२ फेब्रुवारी – हिंदी
२३ फेब्रुवारी – मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू ,पंजाबी ,तामिळ
२४ फेब्रुवारी – संस्कृत
२७ फेब्रुवारी – फिजिक्स
१ मार्च – केमिस्ट्री
३ मार्च – मॅथेमॅटिक्स अॅन्ड स्टॅटिस्टिक्स
७ मार्च – बायोलॉजी
९ मार्च – जियोलॉजी
२५ फेब्रुवारी- ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अॅन्ड मॅनेजमेंट
२८ फेब्रुवारी – सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
१ मार्च – राज्यशास्त्र
१३ मार्च – ऑफिस मॅनेजमेंट पेपर १
१५ मार्च – ऑफिस मॅनेजमेंट पेपर २
९ मार्च – अर्थशास्त्र
१० मार्च – बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
१३ मार्च – बँकिंग पेपर १
१५ मार्च – बँकिंग पेपर २
१६ मार्च – भूगोल
१७ मार्च – इतिहास
२० मार्च – समाजशास्त्र

 

हे ही वाचा :

One Nation One ITR Form : कॉमन आयटीआर फॉर्म म्हणजे काय? संपूर्ण माहिती घ्या जाणून

‘BMC वरही भाजप झेंडा फडकवेल’, आदित्य ठाकरेंचे मतदारसंघात येऊन भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांचे वक्तव्य

Kartiki Ekadashi 2022 : कार्तिकी एकादशीनिमित्त फडणवीस दाम्पत्यांनी वारकऱ्यासोबत धरला ठेका ! पहा फोटो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version