spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एसटी बॅंक निवडणुकीचा निकाल जाहीर, सदावर्तेंच्या पॅनलचा दणदणीत विजय!

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेवर आपली सत्ता आणण्यासाठी सदावर्ते यांनी महाराष्ट्र्भर आपल्या पॅनेलचा प्रचार केला होता. तसेच प्रचार दरम्यान सदावर्ते आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहिले.

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंक (State Transport Co Operative Bank) निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुकीत ॲड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने एकतर्फी आणि दणदणीत असा विजय मिळवला आहे. सर्वच्या सर्व १९ जागांवर एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने विजय मिळवला आहे. यामुळे पुन्हा एकदा एसटी आंदोलनानंतरही एसटी कर्मचाऱ्यांवर ॲड. गुणरत्न सदावर्तेंची यांची जादू कायम राहिली आहे. तसेच संदीप शिंदे (Sandeep Shinde) यांच्या कामगार संघटनेच्या पॅनलचा सदावर्ते यांच्या पॅनलने पराभव केला आहे.

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ७ पॅनलचे १५० हून अधिक उमेदवार आपलं नशीब आजमावत होते. निवडणुकीत उतरलेल्या एसटीतील सर्वच संघटनांकडून महाराष्ट्रभर जोरदार प्रचार करण्यात आला. परंतु या सर्वांना पराभूत करत एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते पॅनल आणि शरद पवार पुरस्कृत संदीप शिंदे यांच्या कामगार संघटनेच्या पॅनलमध्ये बघायला मिळाली. सोबतच एसटी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या गोपीचंद पडळकर यांची सेवाशक्ती संघर्ष संघटना देखील ह्या निवडणुकीत आपलं नशीब आजमावत होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना सपशेल अपयश आल्याचं पाहायला मिळालं.

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेवर आपली सत्ता आणण्यासाठी सदावर्ते यांनी महाराष्ट्र्भर आपल्या पॅनेलचा प्रचार केला होता. तसेच प्रचार दरम्यान सदावर्ते आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहिले. कधी मराठा आंदोलनावर भाष्य तर कधी नथुराम गोडसेयांचे समर्थन करताना ते बघायला मिळाले. एसटी विलिनीकरणाच्या आंदोलनातून एसटी आंदोलनात उडी घेणारे सदावर्ते पहिल्यांदाच कुठल्यातरी निवडणुकीला सामोरे जात होते. अशात एसटी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेची निवडणूक त्यांच्याकडून लढवण्यात आली. या निवडणुकीत सदावर्ते पॅनलला दणदणीत १९ जागांवर विजय मिळाला आहे.

हे ही वाचा : 

महागाईच्या मुद्द्यावर महिला काँग्रेसने मोदी सरकारला जाब विचारावा, काँग्रेसचा हल्लाबोल

Ashadhi Ekadashi 2023, वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपुरात दाखल…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss