spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Samruddhi Mahamarg औरंगाबादहून नागपूरला जाणारी लाल परी ‘या’ तारखेपासून धावणार समृद्धी महामार्गावर

राज्याची उपराजधानी नागपूर (Nagpur) ते आर्थिक राजधानी मुंबईला (Mumbai) जोडणाऱ्या ७०१ किमीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या (hindu hriday samrat balasaheb thackeray samruddhi highway) (समृद्धी महामार्ग) पहिल्या टप्प्यातील नागपूर-शिर्डी या ५२१ किमी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते ११ डिसेंबरला झाले आहे. तर शिर्डी ते मुंबई दरम्यानच्या १८१ किमीचे उर्वरित महामार्गाचे काम १५ जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सुरळीत वाहतूक व्यवस्थेसोबत झिरो अॅक्सिडेंटल कॉरिडोर असणारा हा समृद्धी महामार्ग देशातील पहिलाच महामार्ग ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरु झाला आहे. समृद्धी महामार्गावर दररोज २५ हजार प्रवासी गाड्यांची वाहतूक होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : 

Agnipath Scheme ही योजना ऐच्छिक आहे, ज्यांना समस्या आहेत त्यांनी सहभागी होऊ नये, ‘अग्निपथ’बाबत न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

याचवेळी एसटी महामंडळाने (ST Mahamandal) महत्वाचा निर्णय घेतला असून समृद्धीवरून औरंगाबाद ते नागपूर (Aurangabad To Nagpur) एसटीचा प्रवास करता येणार आहे. १५ डिसेंबर २०२२ पासून औरंगाबाद ते नागपूर अशी एसटीची एक्स्प्रेस समृद्धी महामार्गावरून धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र ही गाडी किती वाजता सोडायची याबाबत अद्याप निर्णय झाला नसून, नियोजन सुरु आहे. तर नागपूर गाठण्यासाठी सद्या एसटीला सुमारे १२ तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र समृद्धी महामार्गामुळे हे तास कमी होऊन सात ते आठ तासांवर येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.

ठाकरेंची ‘महाप्रबोधन यात्रा’, भाजपाची ‘जागर सभा’ यानंतर मनसे आता महाराष्ट्रात ‘भरारी’ घेणार, ‘घे भरारी’मधून महापालिका निवडणुकांची तयारी

समृद्धी महामार्गाचा २४ जिल्ह्यांना लाभ (Samriddhi Highway benefits 24 districts)

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून १४ जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे, हे विशेष. त्यातही मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत अविकसित राहिलेले हे दोन भूप्रदेश महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

Pune News महापुरुषांच्या अवमानकारक विधानाविरोधात पुणे बंद, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Latest Posts

Don't Miss