शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात; आमची यात्रेला कोणता एक रंग नाही, जनतेचा वैविध्यपूर्ण रंग हाच आमच्या यात्रेचा रंग – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (State President of Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar Party Jayant Patil) यांनी बुधवार दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी पत्रकार परिषद घेत 'शिवस्वराज्य यात्रा'ची घोषणा केली आहे. ही यात्रा आज दिनांक ९ ऑगस्ट पासून शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झाली आहे.

शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात; आमची यात्रेला कोणता एक रंग नाही, जनतेचा वैविध्यपूर्ण रंग हाच आमच्या यात्रेचा रंग – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (State President of Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar Party Jayant Patil) यांनी बुधवार दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी पत्रकार परिषद घेत ‘शिवस्वराज्य यात्रा’ची घोषणा केली आहे. ही यात्रा आज दिनांक ९ ऑगस्ट पासून शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा जनतेपुढे पर्दाफाश केला जाईल असे जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेचा टिझर व लोगोही प्रसिद्ध केला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्याचा निर्धार करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली.

यावेळी माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आज महायुती सरकारच्या काळात राज्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला, तरुण, विद्यार्थी कोणताच घटक समाधानी नाही. सरकारने सर्वत्र भ्रष्टाचार माजवला आहे. राज्याची परिस्थिती दैनीय असताना राज्यात रयतेचे राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा जनतेमध्ये जनजागृती करणार आहोत. महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्या पाठिशी ठाम आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे की हे दिल्लीतील सरकार आम्हाला नको आहे. आता राज्यातील हे युती सरकार जाणं हे आपल्या फायद्याचं आहे अशी खात्री जनतेला पटली आहे. त्यामुळे लोकांमध्ये लोकसभेपेक्षा जास्त उत्साह आहे. आमचा हा काही इव्हेंट नाही आम्ही साधेपणाने लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या यात्रेला कोणताही एक रंग नाही, जनतेचा वैविध्यपूर्ण रंग हाच आमच्या यात्रेचा रंग आहे असेही त्यांनी सांगितले.

तर बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यापासून राज्य अधोगतीकडे गेलेले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शेजारचे राज्य आपल्या तरुणांच्या हातचे काम हिसकावून घेत आहेत. हे सर्व सुरू असताना राज्यकर्ते हतबलपणे बसले आहेत. त्यामुळे आम्ही महायुती सरकारचे काळे कारनामे घेऊन जनतेच्या दरबारात जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेऊन यात्रेची सुरूवात करणार अशी माहिती त्यांनी दिली.

हे ही वाचा :

Vidhansabha Election 2024 : ‘या’ ७ विभागात होणार जाहीर सभा; मुख्यमंत्र्यांसह ३ नेत्यांनी घेतला मध्यरात्री निर्णय

Paris Olympics 2024 : भारताच्या खात्यात ‘रौप्य’ पदकाचा मान; Niraj Chopara याने तोडला आपलाच ऑलम्पिक रेकॉर्ड ठरला इतिहाससच मानकरी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version