पहिल्या दिवसापासून कामाला लागलोय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई इथे मंत्रालयात ध्वजारोहण (National Flag hoisting at Mantralaya) करण्यात आलं.

पहिल्या दिवसापासून कामाला लागलोय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय निवास्थान वर्षा येथे स्टार्टअप व नावीन्यता यात्रेचा शुभारंभ करण्यात आला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई इथे मंत्रालयात ध्वजारोहण (National Flag hoisting at Mantralaya) करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातल्या विकासकामांची माहिती दिली. तसेच कोरोनाचा धोका पूर्णपणे संपलेला नाही, असे म्हणत जनतेला काळजी घेण्याचे आणि कोरोनाची लस घेण्याचे आवाहनही केले आहे. महाराष्ट्राला देशात एक अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त देश व राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले

ध्वजारोहणानंतर झालेल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, देश अमृत महोत्सवात न्हाऊन निघालाय. राज्यात आता नवं सरकार स्थापन झालंय. आम्ही पहिल्या दिवसापासून कामाला लागलोय. राज्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टी झालीय. तिथे पंचनामे झाले, यावेळी आम्ही दुप्पट मदत केलीय. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत ओबीसींना दिलासा मिळालाय. स्टार्टअपमुळे ग्रामीण शहरी भागांत सेवा दिली जातेय. पंतप्रधान आणि गृहमंत्री तसंच सगळ्या केंद्रीय मंत्र्यांनी मदतीचं आश्वासन दिलं. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्बंध होते. दोन वर्षांनंतर हा सोहळा होतोय. धोका कमी झालेला नाही, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे कोरोनाचा बुस्टर डोस सगळ्यांनी घ्या, असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तसेच मुसळधार पावसामुळे २८ जिल्ह्यांना फटका बसला आहे. १५ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुमारे १५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. या नागरिकांची सर्व काळजी घेतली आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जलसंपदा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. यातून नद्यांचे खोलीकरण, गाळ काढणे आदी कामांसाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

स्टार्टअपसाठी सरकारकडून पाठबळ देण्यात येत आहेत. नवीन उद्योजक तयार होतील याकडे लक्ष देत आहोत असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. नाविन्यपूर्ण योजना आणि त्यातून उद्योग उभारणीसाठी सरकारकडून मदत देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारने ‘आमचे गुरुजी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये वर्गामध्ये शिक्षकाचे छायाचित्र आणि माहिती असणार आहे. यातून विद्यार्थी आणि पालकांना शिक्षकांची ओळख होईल. राज्यात कोणतीही शाळा एक शिक्षकी राहणार नसल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच जनतेच्या हिताची कामे सुरू असून शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

 

हे ही वाचा :-

येणारी २५ वर्षे मोठ्या संकल्पाची – पंतप्रधान नरेंद्र मोदी

ठाण्यात मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ध्वजारोहण 

 

Exit mobile version