राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आज शेतकऱ्यांच्या बांधावर

मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे अमाप नुकसान झाले आहे.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आज शेतकऱ्यांच्या बांधावर

मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे अमाप नुकसान झाले आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही परळी वैजनाथ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई या भागात तसेच मराठवाड्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळेच कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज स्वतः शेतकऱ्यांच्या (Farmers) बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

आज धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यामधील काही गावांमध्ये पाहणी केली. यावेळी पाहणी करताना गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला असल्याचे वास्तव समोर आले. गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे एकूण उत्पन्नावर जर परिणाम होणार असेल तर या पिकांचे महसूल आणि कृषी विभागामार्फत पंचनामे केले जावेत. उत्पादनाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करता यावे, यासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाशी दूरध्वनीवरून संपर्क साधत उद्या सायंकाळपर्यंत पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

 

गोगलगायींना नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरणारे मेटाडेल हे औषध बाजारात सहजरित्या उपलब्ध असून त्याची किंमतही फार जास्त नाही. तेव्हा जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून कृषी विभागाला राखीव ठेवण्यात येणाऱ्या निधीमधून या औषधाची खरेदी कृषी विभागाला करता येईल का? याबाबत चाचपणी करून तातडीने निर्णय घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गोगलगायींना नष्ट करण्याच्या विविध औषधी आणि उपाययोजनांबाबतही माहिती घेतली. धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

भारतासाठी तिसरा दिवस ठरला कठीण, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचे उत्तम प्रदर्शन

समृद्धी महामार्गावरील टोल प्रकरणावर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले “साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले…

समृद्धी महामार्गावरील टोल प्रकरणावर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले “साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version