spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Paithan : मुख्यमंत्र्यांना गावात आणण्यासाठी एका तरुणाने जिवाच्या आकांताने केले प्रयत्न

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपदाची जवाबदारी घेतल्यापासून ते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दौरे करत आहे. या दौऱ्यात त्यांचे जंगी स्वागत केले जाते,पण अनेकदा मुख्यमंत्र्यांना दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी थांबणे शक्य होत नाही. मात्र औरंगाबादच्या दौऱ्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पायावरच लोळण घालत एका कार्यकर्त्याने त्यांना आपल्या गावात घेऊन गेल्याचं समोर आले आहे. विशेष म्हणजे कार्यकर्ता कोणतीच परिस्तिथी समजून घेण्यास तयारच नसल्याने अखेर हतबल झालेल्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा ताफा फिरवत पैठणमधील आपेगावात हजेरी लावली.

कार्यकर्त्याचे शर्थीचे प्रयत्न

मुख्यमंत्री आपल्या गावात येत नसल्याची माहिती मिळताच आपेगावातील शिंदे समर्थक असेलला ‘शिवाजीराव दिवटे’ नावाचा कार्यकर्ता थेट भुमरे यांच्यावर बंगल्यावर जाऊन धडकला. त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांच्या समोर जाऊन उभा राहिला आणि ‘तुम्ही आपेगावला येण्याचे कबूल केलं होतं, आता तुम्हाला यावंच लागतंय,’ अशी विनवणी करू लागला.

हेही वाचा : 

पत्राचाळ घोटाळ्याप्रकारणी ईडीचा मोठा खुलासा, माजी मुख्यमंत्र्यांचा हात?

मुख्यमंत्री कार्यकर्त्यांसमोर हतबल झाले

‘शिवाजीराव दिवटे यांनी गावात येण्याची विनंती केली, मात्र मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. पण कार्यकर्ता निर्धार करून आला होता, त्यामुळे माघे हटण्याचा विषयच नव्हता. त्याने थेट मुख्यमंत्री शिंदेंच्या पायावरच लोळण घेतली. आता तुम्ही जोपर्यंत ‘चलतो’, असं म्हणणार नाही तोपर्यंत पाय सोडतच नाही, असं त्यानं बजावलं. याचवेळी आपल्या कार्यकर्त्याच्या मागणीला भुमरेंनीही हळूच पाठिंबा दिला. मग काय हतबल झालेल्या मुख्यमंत्री यांनी आपेगावत येण्याचं कबूल, करत पुन्हा ताफा आपेगावाच्या दिशेने वळवला.

अखेर मुख्यमंत्री शिंदे आपेगावला रवाना

मुख्यमंत्री आपल्या गावात येणार असल्याने आपेगावातील गावकऱ्यांनी मोठी तयारी केली होती. ठिकठिकाणी मोठ-मोठे होर्डिंग लावण्यात आले होते. तसेच एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी भला मोठा हार तयार करण्यात आला होता. यापूर्वी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असतांना गावात आले होते. त्यामुळे दुसऱ्यांदा आपल्या गावात मुख्यमंत्री येत असल्याचा वेगळा आनंद गावकऱ्यांमध्ये होता. त्यामुळे काहीही झालं तरी मुख्यमंत्री आपल्या गावात आलेच पाहिजे असा निर्धार करून गेलेल्या शिवाजीराव दिवटे यांनी मुख्यमंत्र्यांना गावात आणून अखेर मोहीम फत्ते केलीच.

मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकार स्थापन करणार नवी समिती; चंद्रकांत पाटील असणार अध्यक्ष

संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठण येथील श्रीक्षेत्र एकनाथ महाराज मंदिरास भेट देऊन श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर विश्वस्त मंडळाच्यावतीने शाल,श्रीफळ, एकनाथ महाराजांची मूर्ती आणि ग्रंथ देऊन मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

२० सप्टेंबरपासून कोकणकन्या एक्सप्रेस कात टाकणार

Latest Posts

Don't Miss