Wednesday, September 25, 2024

Latest Posts

राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर , नागपूर मध्ये ४८ तासात २५ रुग्णांचा मृत्यू

नांदेड मधील शासकीय रुग्णालयात मागील दोन दिवसांपासून ३१ रुग्णानाचे मृत्यू झाले आहेत.

नांदेड मधील शासकीय रुग्णालयात मागील दोन दिवसांपासून ३१ रुग्णानाचे मृत्यू झाले आहेत. तसेच आता नांदेड पाठोपाठ नागपूर मधील वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील गेल्या २४ तासांत २५ रुग्णांनाचा मृत्यू झाला आहे. यातील १६ रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तर ९ रुग्ण हे इंदिरागांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत. या रुग्णालयांमध्ये २५ पैकी १२ रुग्ण हे शेवटच्या क्षणाला खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खाजगी रुग्णालयात रुग्णांची स्थिती बघून त्यांना अॅडमिट करून घेतले जाते. पण तसे शासकीय रुग्णालयात नाही. शासकीय रुग्णालयात सर्वच रुग्णांना घेतले जाते. त्यामळे मृत्यूचे आकडे मोठे आहेत असे रुग्णालय प्रशासनाने म्हंटले आहे.

खाजगी रुग्णालयात मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी शेवटच्या क्षणाला रुग्णाला शासकीय रुग्णालयात दाखल होण्यास सांगतात. अत्यवयस्थ अवस्थेतील व्हेंटिलेटरवरचे रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठवले जातात. २५ पैकी १२ रुग्ण हे शेवटच्या क्षणी रुग्णालयात दाखल झाले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ८ ते इंदिरा गांधी शासकीय महाविद्यात चार रुग्ण आले होते. खाजगी रुग्णालय रुग्णाची स्थित बघून अॅडमिट करून घेतात तर शासकीय रुग्णालयात सर्वांनाच अॅडमिट करून घ्यावे लागते त्यामुळे मृत्यूचे हे मोठे आकडे दिसत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात मृत्यूचा तांडव सुरु आहे. नांदेड मध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात १६ नवजात बालकांचा समावेश आहे. नांदेड मध्ये एका दिवसात २४ मृत्यूची नोंद झाली आहे. एका बेडवर दोन ते तीन बालकांवर उपचार सुरू होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातील बालकांना एकमेकांनाचे इन्फेक्शन होऊन ती दगावली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे त्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. ठाण्याच्या कळवा रुग्णालयात झालेल्या मृत्यूतांडवाला जबाबदार कोण याचा अहवाल अजून सादर झाला नाही. त्यातच आता नांदेड आणि औरंगाबादमध्ये आणखी काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सरकारी रुग्णालयांची दुरवस्था आणि प्रशासनाची अनास्था पुन्हा अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

हे ही वाचा: 

हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

आजचे राशिभविष्य,०४ ऑक्टोबर २०२३, अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss