spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे.”; Raj Thackeray यांचा मालवण घटनेवर प्रक्षोभ

'मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ़्यांचा. आंबेडकर म्हणाले ,मी फ़क्त बौद्धांचा. टिळक उद़्गारले ,मी तर फ़क्त चित्पावन ब्राम्हणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले , तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !'

शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ९ महिन्यात कोसळतो त्यावेळी हा पुतळा उभारणारे कॉन्ट्रॅक्टरचं ऑफिस तरी कसं नीट राहू शकत. त्या ऑफिसची तोडफोड करून शिवप्रेमींनी आपला संताप व्यक्त केला आहे. तो या मार्फत व्यक्त झाला असल्याचे दिसून येते. तेथील आमदार वैभव नाईक यांनी आपली या संदर्भातील भूमिका बजावली आहे. मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट किनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नौदल दिनानिमित्त राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी या पुतळ्याचे अनावरण झाले होते. काल (सोमवारी) ही घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पुतळा कोसळल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने या पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरून शिवप्रेमी हे  संतप्त झाले आहेत. शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरीही या पुतळ्याची दुरावस्था होत आहे. या प्रकरणाने शिवप्रेमींमध्ये तांडव सुरु आहे. ही स्मारक उभारणी केवळ आणि केवळ राजकीय दृष्टीने झाली आहे. यावर शिवप्रेमींचा या घटनेमुळे विश्वास बसण्यास मदत झाली आहे. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये जनप्रक्षोभ पाहायला मिळाला. याच घटनेवर राज ठाकरे यांनी खरमरीत भाष्य केले आहे.

राज ठाकरे यांनी नेमके काय केले ट्विट ?

“मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती? आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील ‘पाच पुतळ्यांवरची’ कविता आठवली. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देत आहे. ‘मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ़्यांचा. आंबेडकर म्हणाले ,मी फ़क्त बौद्धांचा. टिळक उद़्गारले ,मी तर फ़क्त चित्पावन ब्राम्हणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले , तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !’ पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे. ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो.”

हे ही वाचा:

“प्रधानमंत्रांसारख्या मोठ्या माणसाला काळे झेंडे दाखवता हे सर्वथा अनुचित आहे”; Dada Bhuse यांचे मंतव्य

“विकृत मानसिकता सत्ताधाऱ्यांमुळे होत असेल तर ही शोकांतिका”; Praniti Shinde यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss