spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पोलीस भरतीसाठी करावी लागणार अजून प्रतीक्षा; पोलीस भरती पुढे ढकलली

नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. एक नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. राज्यभरात तब्बल १४९५६ पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्यातली पोलिस भरती पुढे ढकलल्याची माहिती आहे. प्रशासकीय कारणास्तव पोलिस भरती पुढे ढकलली असल्याचं सांगण्यात येतंय. पुढील महिन्यामध्ये १४ हजार ९५६ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. आता पोलिस भरतीसंदर्भातली नवी जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आज पोलिस महासंचालक कार्यालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलेलं आहे.

राज्य सरकारनं पोलीस भरतीला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजी न करता आपली तयारी कायम ठेवावी, असे आवाहन एबीपी माझाकडून करण्यात येत आहे. आज स्थगिती देण्यात आलेली भरतीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकिय कारणास्थव पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आली आहे. मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झालेली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजन पोलीस भरतीसाठी पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून कळतेय. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.

मुंबई – ६७४०, ठाणे शहर – ५२१, पुणे शहर – ७२०, पिंपरी चिंचवड – २१६, मिरा भाईंदर – ९८६, नागपूर शहर – ३०८, नवी मुंबई – २०४, अमरावती शहर – २०, सोलापूर शहर- ९८, लोहमार्ग मुंबई – ६२०, ठाणे ग्रामीण – ६८, रायगड -२७२, पालघर – २११, सिंधूदुर्ग – ९९, रत्नागिरी – १३१, नाशिक ग्रामीण – ४५४, अहमदनगर – १२९, धुळे – ४२, कोल्हापूर – २४, पुणे ग्रामीण – ५७९, सातारा – १४५, सोलापूर ग्रामीण – २६, औरंगाबाद ग्रामीण- ३९, नांदेड – १५५, परभणी – ७५, हिंगोली – २१, नागपूर ग्रामीण – १३२, भंडारा – ६१, चंद्रपूर – १९४, वर्धा – ९०, गडचिरोली – ३४८, गोंदिया – १७२, अमरावती ग्रामीण – १५६, अकोला – ३२७, बुलढाणा – ५१, यवतमाळ – २४४

हे ही वाचा :

घटनाबाह्य सरकार आल्याने हे इंजिन फेल गेलं; उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेणार आहात का? – आदित्य ठाकरे

राम शिंदे साहेब, पुड्या सोडू नका तर पुरावा द्या; रोहित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss