spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जालना शहरात पुन्हा दगडफेक आणि लाठीचार्ज, पोलिसांकडून शांतता राखण्याचे आवाहन

जालना (Jalna) जिह्ल्यात शुक्रवारी रात्री पोलिसांनी मराठा समाजाच्या उपोषणस्थळी लाठीमार केल्याने संतप्त जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली.

जालना (Jalna) जिह्ल्यात शुक्रवारी रात्री पोलिसांनी मराठा समाजाच्या उपोषणस्थळी लाठीमार केल्याने संतप्त जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली. यावेळी मोठ्या प्रमाणावर लाठीमार आणि दगडफेक करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा जालना शहरात लाठीमार आणि दगडफेक करण्यात आली आहे . जालन्यातील ग्रामीण भागातील घटनेमुळे आज शहरात पुन्हा लाठीमार आणि दगडफेक करण्यात आली. काही तासांपूर्वी झालेल्या पोलीस आणि आंदोलकानामध्ये झालेल्या बाचाबाचीत पुन्हा लाठीमार आणि दगडफेक करण्यात आली. जालना शहरात आणि ग्रामीण भागात अजूनही तणावपूर्ण वातवरण आहे. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली आहे. जालना शहरातील अंबड चौफुली येथे एका ट्रकला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांनी जालना शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला आहे. तसेच बदनापूर रस्त्या जवळील एका शासकीय वाहनाला आग लावण्याचा प्रयत्न केला आहे.

कालच्या घटनेनंतर आज जालन्यामध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. पण ग्रामीण भागातील वादाचे पडसाद शहरी भागात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. शहरातील लोकांनी अंबड चौकात ट्र्क पेटवून दिल्याने सगळीकडे वातावरण चिघळण्याची शक्यता होती म्हणून पोलिसांनी लाठीमार करत जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला. आता घटनास्थळी दंगा काबू पथक तैनात केले आहे.

जालनामधील या घटनेच्या पार्शवभूमीवर पोलिसांनी शांतता राखण्याचे अहावान केले आहे. पण मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी गाड्या,रस्ता रोको आंदोलन केली आहेत. आंदोलकांनी हिंसा न करता आंदोलन करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच कोणीही कायदा हातात न घेतात, कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये असे सांगण्यात आले आहे. पोलिसांचे परिस्थितीवर लक्ष असून, कोणीही अफवा पसरवू नयेत असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Latest Posts

Don't Miss