कोल्हापुरात जुन्या पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

शिक्षक, शासकीयसह राजपत्रित अधिकाऱ्यांचे ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ हे दाखवून देण्यासाठी आज दि ४ मार्च रोजी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वात गांधी मैदानातून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे.

कोल्हापुरात जुन्या पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

शिक्षक, शासकीयसह राजपत्रित अधिकाऱ्यांचे ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ हे दाखवून देण्यासाठी आज दि ४ मार्च रोजी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वात गांधी मैदानातून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये अनेक शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांकडून सहभागी होते. या मोर्च्यामार्फत राज्य सरकारला निर्णायक इशारा देखील देण्यात आला. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत्या बजेटमध्ये जुन्या पेन्शनची घोषणा करावी, अशी मागणी करण्यात आली.

कोल्हापूरमध्ये गांधी मैदानातून या मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी अनेक कर्मचारी एकवटले होते. तसेच कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. गांधी मैदानातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. तसेच या मोर्च्यात कर्मचाऱ्यांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते. नका करु जुन्या पेन्शनची बेरीज, नाही तर आणू सत्ताधाऱ्यांना जेरीस. आमचं ठरलंय, आता आम्ही नाही मागे हटणार, जुनी पेन्शन घेऊनच शांत बसणार असा मजकूर लिहिलेले फलक लक्ष वेधून घेत होते. तसेच या वेळी बोलत असताना सतेज पाटील म्हणाले की, “कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार जुनी पेन्शन योजना लागू करावी. नवी पेन्शन त्यांच्या हिताची नाही. त्यांना जुन्या पेन्शनमुळेच दिलासा मिळणार आहे. येत्या अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा करण्यात यावी. निर्णय न झाल्यास संघटना जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल.” १४ मार्चपासून कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या काम बंद आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा :

मोठी बातमी ! मनसे नेते संदीप देशपांडेवर मॉर्निंग वॉकवेळी हल्ला, जाणून घ्या हेल्थ अपडेट

Women’s Premier League, पहिला सलामी सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स

ठामपाच्यावतीने गरजू महिलांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना’ सुरू करावी शिवसेनेची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version