spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिक्षण मंत्र्यांचे मतदारसंघ असलेल्या पुण्यात विद्यार्थ्यांचे ‘अभाविप’ आंदोलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता आक्रमक वळण लागले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पुणे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांच्या कार्यालयात घुसून आंदोलन केले. यावेळी सुरक्षा रक्षकांनी परीक्षा नियंत्रक कार्यालयाचे गेट बंद करण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्यांनी त्यांना न जुमानता प्रवेशद्वारमध्ये घुसून आंदोलन केले. विद्यापीठाला कुलुगुरू नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहे.

हेही वाचा : 

उद्या पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी, शिंदे कोणाची भेट घेणारा?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवक क्रांती दल आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी अभाविपकडून उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू. प्र-कुलगुरू, कुलसचिव नसल्याने विद्यापीठातील कारभारावर कोणाचे नियंत्रण नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचा आरोप अभाविपने केला. तर, यावेळी विद्यापीठाचे प्रशासन व्हेंटिलेटरवर असल्याचे दर्शवण्यासाठी अभाविपने चक्क रुग्णवाहिका विद्यापीठात आणली होती.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि अशोक गेहलोत यांच्यात चुरस तर, राहुल गांधीच्या अध्यक्षपदावर टांगती तलवार

Latest Posts

Don't Miss