अमरावतीत बालकांच्या ICU मध्ये लागली अचानक आग, दोन बालके जखमी

अमरावतीत बालकांच्या ICU मध्ये लागली अचानक आग, दोन बालके जखमी

अमरावती (Amravati) मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. अमरावती शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात (Women’s Hospital) आज आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण लहान मुलांच्या अतिदक्षता कक्षाला ( intensive care unit) लागलेल्या या आगीत दोन बालके (Two children) किरकोळ जखमी (Minor injuries) झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने पंजाबराव देशमुख रुग्णालयात (Panjabrao Deshmukh hospital) दाखल करण्यात आले आहे.

 समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागात अचानक आग लागल्याचे समोर आले. या घटनेनं रुग्णालय परिसरात मोठी खळबळ उडाली. आगीची माहिती कळताच रुग्णालयातील स्टाफसह रुग्णांच्या नातेवाईकांनीही धाव घेतली आणि लहान मुलांना तातडीने दुसऱ्या वॉर्डात नेण्यात आलं. या घटनेमध्ये दोन मुलं किरकोळ जखमी झाली आहेत.

आगीमुळे रुग्णालयात धूर झाल्याने काही मुलांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे. परंतु आता आग आटोक्यात आणण्यात यश आल्याचे समजते. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून अद्याप याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आता सर्व स्तरावरून रुग्णालयाच्या व्यवस्थापनेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. रुग्णालयात फायर ऑडिट करण्यात आला होता का असा सवाल स्थानिकांन कडून करण्यात येत आहे. पण रुग्णालयात आग लागलेलं समोर आल्या बोरबर लहान मुलांना त्वरित दुसरी कडे हलवल्याने मोठा अनर्थ टाळला आहे.

हे ही वाचा:

महिला भारतीय संघाने उडवला इंग्लंडचा धुव्वा

‘वर्षा’ सोडताना नवरीसारखं सोंग केलं; संदिपान भुमरेंची खोचक टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version