spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखवले जावेत Sudhir Mungantiwar यांचे निर्देश

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील टुरिंग आणि तंबू सिनेमाच्या चालकांना ऐतिहासिक घटनांचे चित्रण करणारे चित्रपट प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील टुरिंग आणि तंबू सिनेमाच्या चालकांना ऐतिहासिक घटनांचे चित्रण करणारे चित्रपट प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत. या ऑपरेटर्सनी कमाईचा पर्यायी स्त्रोत म्हणून विविध सरकारी योजनाच्या जाहिराती दाखवाव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत राज्यभरातील टुरिंग टॉकीज आणि तंबू चित्रपटगृहांच्या जतनावर चर्चा करून गुरुवारी (दि. २९ ऑगस्ट) हे निर्देश देण्यात आले. राज्यातील टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखवले जावेत. या चित्रपट प्रदर्शनादरम्यान शासकीय योजनांच्या जाहिरातींचीही प्रसिद्धी करावी. याबाबत विभागाने तातडीने योग्य पावले उचलावी अशा सूचना वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिल्या. ते या बैठकीत म्हणाले की, “टुरिंग टॉकीज व तंबू सिनेमा चालकांनी दुर्गम भागात प्रमुख व्यक्तींचा वारसा नेण्यासाठी ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपट दाखवावेत. ते राज्य सरकारच्या योजनांशी संबंधित काही जाहिराती देखील दाखवू शकतात. अशा जाहिरातींमुळे त्यांना उत्पनाचा आणखी एक स्त्रोत उपलब्ध होऊ शकतो.”

पुढे ते म्हणाले की, “टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक दाखविल्यास थोर महापुरुषांचे विचार व कार्य घराघरात पोहोचेल. या चित्रपट प्रसारण प्रसंगी शासकीय योजनांच्या जाहिरातीही दाखविल्यास शासकीय योजना ही तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. जाहिरात प्रसारणामुळे टुरिंग टॉकीज व तंबू मालकांना आर्थिक मदतही मिळेल.” टुरिंग टॉकीज व तंबू मालकांना देण्यात येणारे भांडवली अनुदान एक रक्कमी देण्याबाबत मंत्री मुनगंटीवार यांनी सूचना केल्या.

टुरिंग टॉकीज तंबूतील सिनेमांचे जतन व पुनर्वसन या संदर्भात वनमंत्री मुनगंटीवार यांनी मंत्रालयातील परिषद सभागृहात बैठक घेतली. बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे, चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्यासह टुरिंग टॉकीजचे मालक व प्रतिनिधी उपस्थित होते.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss