spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या, २३ व्या मजल्यावरुन उडी मारून जीवन संपवलं

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोरवाल हे भायखळा येथे ते राहत होते. त्याच इमारतीच्या २३व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली आहे. अद्याप त्यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र पोलिसांनी तापास सुरु केला आहे.

हेही वाचा : 

‘माझ्या वेड्या मना..’ गाण्यातून अभिनेता आयुष संजीव बनतोय तरुणाईच्या गळ्यातील ताईत…!

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि दक्षिण मुंबईतील अनेक चाळींचं रिडेव्हलपमेंट करणारे प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी आज आत्महत्या केली आहे. भायखळा येथील राहत्या इमारतीच्या २३व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. सकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पारस पोरवाल यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Deepali Sayyed : ‘सध्या मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत’, अंधारेंच्या एन्ट्रीनंतर दिपाली सय्यद यांचा सूचक इशारा

इमारतीचे टेरेस वरून उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यांच्या जिमच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, कोणाचीही चौकशी करू नये, असे लिहिलेले आहे. नातेवाईकांनी त्यांचे अक्षर ओळखले आहे. त्यांचाही कुणावर संशय नसल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे.

MCA Election : दिग्गज राजकारणी एकाच मंचावर ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Latest Posts

Don't Miss