Saturday, July 6, 2024

Latest Posts

Sunetra Pawar होणार खासदार, राज्यसभेवर झाली बिनविरोध निवड

लोकसभा खासदारकी न मिळवू शकलेल्या सुनेत्रा पवार यांची आता संसदेत बॅकडोअर एंट्री होणार आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यसभा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ (Loksabha Election 2024) मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha Constituency) झालेल्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे लोकसभा खासदारकी न मिळवू शकलेल्या सुनेत्रा पवार यांची आता संसदेत बॅकडोअर एंट्री होणार आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यसभा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी, ‘पक्षाने मला आज अधिकृत उमेदवारी दिली आहे, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह सर्व नेत्यांचे आभार मानते, ‘ असे वक्तव्य केले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची काल (बुधवार, १२ जुलै) रात्री उशिरा बैठक पार पडली. यावेळी, सुनेत्रा पवार यांच्या नावाची बिनविरोध निवड करण्यात आली. यानुसार, सुनेत्रा पवार यांनी सकाळी विधानभवनात जाऊन अर्ज दाखल केला. त्यांच्याव्यतिरिक्त कोणाचाही अर्ज आलेला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे अजित पवार, कार्याध्यक्ष, आणि कार्यकर्त्यांचे आभार मानते. दिलेल्या संधीचे मी सोने करेन.लोकसभेच्या उमेदवारीची जनतेतून मागणी करण्यात आली होती. राज्यसभा उमेदवारीचीही जनतेतून मागणी करण्यात आली आहे. माझ्यावर जो विश्वास पक्षाने दाखवला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते,” असे त्या म्हणाल्या.

सुनेत्रा पवार यांना दिलेल्या राज्यसभा खासदारकीवरून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. छगन भुजबळ यांच्या नाराजीविषयी त्या म्हणाल्या, “माझ्या उमेदवारीबाबत कोणतीही नाराजी दिसलेली नाही. फॉर्म भरतेवेळी भुजबळ देखील पक्षातर्फे उपस्थित होते. त्यांनी देखील मलाया शुभेछया दिल्या.”

यावेळी सुनेत्रा पवार त्यांचा अर्ज दाखल करताना अजित पवार गवताचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि आमदार नरहरी झिरवळ हे उपस्थित होते. ,तर महायुतीमधील एकही नेता यावेळी उपस्थित नव्हता. त्यामुळे, राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले आहे.

हे ही वाचा:

MNS चा ‘दोनशे पार’चा नारा; निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी

OBC लोकांचे मतांमध्ये वापर करण्याचे काम BJP करत आहे, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss