आमदार जयकुमार गोरेंना सर्वोच्च न्यायालयाकडून झटका

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही आज फेटाळून लावला आहे.

आमदार जयकुमार गोरेंना सर्वोच्च न्यायालयाकडून झटका

आमदार जयकुमार गोरेंना सर्वोच्च न्यायालयाकडून झटका

Supreme Court : भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही आज फेटाळून लावला आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पूर्णपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. वडूज जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक टाळण्यासाठी धाव घेतली होती. मात्र कुठेच दिलासा न मिळाल्याने जयकुमार गोरे यांनी सर्वोच्च न्यायालाकडून अपेक्षा ठेवली होती.

नेमके प्रकरण काय?

आमदार जयकुमार गोरे यांच्यासह एकूण सहा जणांवर मायणी गावातील जमिनीबाबत खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात दहिवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे जमिनीची खोटी कागदपत्रे बनवण्यात तलाठी देखील आरोपी आहे. आरोपी तलाठी सध्या फरार आहे.

हेही वाचा : 

Free Booster Dose : १८ वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत…

Exit mobile version