Thursday, July 4, 2024

Latest Posts

सातत्याने NEET परीक्षा रद्द होतेय, हा केंद्र सरकारचा हलगर्जीपणा आहे: Supriya Sule

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करात आपले मत मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करात आपले मत मांडले. NEET परीक्षेवरून झालेल्या गोंधळावरून त्यांनी केंद्र सरकारवर (Central Government) जोरदार ताशेरे ओढले. “सातत्याने NEET परीक्षा रद्द होतेय, हा केंद्र सरकारचा हलगर्जीपणा आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सातत्याने NEET परीक्षा रद्द होत असून हा केंद्र सरकारचा हलगर्जीपणा आहे. तलाठ्याच्या परीक्षेंपासून ते डॉक्टरच्या परीक्षेपर्यंत सगळीकडेच प्रशासन फेल होताना दिसतयं. या सर्व प्रकाराची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने जीएसटी कौन्सिल मध्ये कोण हजर होतं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्यात आरक्षणप्रश्नी सुरु असलेल्या मराठा – ओबीसी वादावर भाष्य करत त्या म्हणाल्या, “आरक्षण हा विषय अतिशय संवेदनशीलपणे महाराष्ट्र सरकारने बघितला पाहिजे. उपोषणाला दहा-पंधरा दिवस का खेचत राहत, हे सरकार? मराठा असो, धनगर, लिंगायत, मुस्लिम कोणत्याही समाजाचा आरक्षणाचा विषय असू दे, लवकर निर्णय घेतला पाहिजे. दहा वर्ष केंद्र सरकारमध्ये त्यांचे ३०० खासदार आहेत. बाकीच्या राज्यांची आरक्षणाची चर्चा होते, महाराष्ट्राची का होत नाही. देशात जिथे जिथे आरक्षणाची मागणी आहे, ती सगळी बिल मागवा. दहा वर्षे त्यांनी केंद्रात सत्ता असून काय केलं. देवेंद्र फडणवीस आमच्या घरापाशी येऊन म्हणाले होते, पहिल्या पंधरा दिवसात धनगर समाजाला आरक्षण देऊ,” असे त्या म्हणाल्या.

सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटावर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पैसेवाटप केल्याच्या आरोपांवर त्या म्हणाल्या,” सत्ताधाऱ्यांनी दुर्दैवी महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गलिच्छ केलं. घरं फोडा, पक्ष फोडा, पैसे वाटा, ५० खोके एकदम ओके… मराठी माणूस स्वाभिमानी आहे, 50 खोके नॉट ओके… त्यांनी ५० खोके वाल्यांना केव्हाच रिजेक्ट केलं आहे.”

हे ही वाचा

“काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे” ; CM Eknath shinde यांची विरोधकांवर सडकून टीका

Nashik Teachers Constitutiecy: Sushma Andhare यांचा पैसे वाटल्याचा गंभीर आरोप; Kishor Darade यांचे प्रत्युत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss