spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Asia First Woman Loco Pilot | वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या सारथ्य करणाऱ्या आशियातील पहिल्या महिला लोको पायलट ठरल्या सुरेखा यादव

आशियातल्या पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव (Surekha Yadav) यांनी सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेसचं (vande bharat train) सारथ्य करून मध्य रेल्वेच्या शिरपेचात स्वतःच नाव कोरल आहे.

आशियातल्या पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव (Surekha Yadav) यांनी सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेसचं (vande bharat train) सारथ्य करून मध्य रेल्वेच्या शिरपेचात स्वतःच नाव कोरल आहे. सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ८ वर सत्कार करण्यात आला.यावेळी लोको पायलट सुरेखा यादव (Surekha Yadav) म्हणाल्या की, नवीन काळातील, अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे पायलट करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञ आहे. गाडी योग्य वेळी सोलापूरहून निघाली आणि वेळेच्या ५ मिनिटे आधीच सीएसएमटीला पोहोचली.

सुरेखा यादव यांचा जन्म २ सप्टेंबर १९६५ रोजी सातारा येथे झाला. सातारा येथील सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूलमधून तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम घेतला आणि नंतर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला. तिला कधीच लोको पायलट व्हायचे नव्हते.

सामान्य मुलींप्रमाणे बी-एड पदवी करून शिक्षिका होण्याचे तिचे स्वप्न होते. पण जेव्हा ती भारतीय रेल्वेत काम करू लागली, तेव्हा तिला लोको पायलट व्हायची इच्छा झाली. वंदे भारत एक्सप्रेस चोखपणे चालवणाऱ्या सुरेखा यांना कार किंवा बाईक चावण्याचा कोणताही अनुभव नाही. त्यामुळे जड वाहने चालवणाऱ्या अनेक महिलांसाठी त्या एकप्रकारे प्रेरणास्थान बनल्या आहेत. सुरेखा यांनी पुण्यातील डेक्कन क्वीन ते सीएसटी मार्गावर ट्रेन चालवली आहे, जो सर्वात धोकादायक रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो.

हे ही वाचा :

Income Tax Saving, तुम्हाला इन्कम टॅक्स वाचवायचा? तर या महिन्यात हे महत्त्वाचे काम नक्की करा

२० हजार आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर, तर सभागृहातल्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले

जुन्या पेंशन योजनेसाठी सुरू असलेल्या आंदोलनातून सरकारने तातडीने मार्ग काढावा, अजित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss