spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Parambir Singh : परमबीर सिंह खंडणी प्रकरणातील निलंबित पोलीस पुन्हा सेवेत

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह पाच पोलीस अधिकाऱ्यांविरोधात मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात अटक झालेले पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व आशा कोरके यांना पुन्हा सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे. अटकेनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांविरोधातील अंतर्गत चौकशीच्या निष्कर्षांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर १० महिन्यांहून अधिक काळ निलंबित असलेल्या या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले. व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी परमबीर सिंह, गोपाळे आणि कोरके यांच्यासह अन्य पाच अधिकारी, संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरुद्ध फसवणूक आणि खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा : 

Sharad Pawar : शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दलची डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट

अग्रवाल यांनी सिंग, अन्य पाच पोलिस अधिकारी, बिल्डर संजय पुनमिया आणि व्यापारी सुनील जैन यांच्याविरुद्ध फसवणूक आणि खंडणीची तक्रार दाखल केली होती. अग्रवाल यांनी आरोप केला होता की त्यांना एका प्रकरणात खोटे गोवण्यात आले आणि सिंग, पुनमिया आणि इतरांनी त्यांच्याविरुद्ध कट रचला आणि त्यांना अटक न करण्याच्या बदल्यात पैशाची मागणी केली. सीआयडीने पुनमिया, जैन, गोपाळे आणि कोरके यांना अटक केल्यानंतर एजन्सीने याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले.

Kartiki Ekadashi 2022 : यावर्षीची कार्तिकी एकादशी कधी साजरी होणार? घ्या संपूर्ण माहिती जाणून

दरम्यान, गोपाळे आणि कोरके यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. आपल्याला खोट्या गुंतवण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा दोन्ही पोलिसांनी केला आहे. या खटल्यात या दोघांना या वर्षी अनुक्रमे मार्च आणि फेब्रुवारीमध्ये जामीन मिळाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माजी सीपी सिंग यांचे नाव असलेल्या इतर सर्व प्रकरणांसह या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे आहे.

परमबीर सिंह खंडणीप्रकरणात गोपाळे आणि कोरके यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र, शिंदे – फडणवीस सरकार येताच नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके पुन्हा सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे निर्णय फिरवण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. आता महाविकास आघाडीच्या काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात होणार मतदान

Latest Posts

Don't Miss