अरबी समुद्रातील संशयास्पद बोटीचा पाकिस्तानी कनेक्शन नसल्याचा दावा

अरबी समुद्रामध्ये आढळलेल्या संशयास्पद बोटीबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. मुंबई आणि पालघर किनारपट्टीपासून ४४ नौटीकल मैलावर तटरक्षक दलाने पकडलेल्या बोटीमध्ये कोणताही पाकिस्तानी खलाशी नाही हा प्रकार गैरसमजातून झाला आहे असा खुलासा बोटीचा अर्थसाहाय्य करणाऱ्या उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने केला आहे.

अरबी समुद्रातील संशयास्पद बोटीचा पाकिस्तानी कनेक्शन नसल्याचा दावा

अरबी समुद्रामध्ये आढळलेल्या संशयास्पद बोटीबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. मुंबई आणि पालघर किनारपट्टीपासून ४४ नौटीकल मैलावर तटरक्षक दलाने पकडलेल्या बोटीमध्ये कोणताही पाकिस्तानी खलाशी नाही हा प्रकार गैरसमजातून झाला आहे असा खुलासा बोटीचा अर्थसाहाय्य करणाऱ्या उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या बोटीमध्ये पाकिस्तानी नागरीक असल्याची माहिती समोर आली होती. परंतु आता त्या प्रकरणाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. ‘जलराणी’ ही बोट उत्तन मधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे. दोन वर्षाआधी त्या बोटीला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत आर्थिक मदत केली होती. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष लिओ कॉलासो यांनी दिली आहे.

 

आज सकाळी ही बोट तटरक्षक दलाच्या जवानांनी त्यात पाकिस्तानी नागरिक असल्याच्या संशयावरून पकडली होती परंतु यातील सर्व पंधरा खलाशांनी आधार कार्ड आमच्याकडे असून त्यात कोणीही पाकिस्तानी नागरिक नाही अशी माहिती मिळाली आहे. सदरची बोट ही मासेमारीसाठी गेली आहे आणि ती संपर्काबाहेर असल्याने तिच्या अलीकडे असणाऱ्या निर्गम या बोटीवरून जलराणी बोटीशी संपर्क साधण्यात आला आहे. या बोटीने उत्तन किनारी तिने परतावे अशा सूचना दिल्या गेल्या आहेत असं कोलासो यांनी सांगितलं. ही बोट मासेमारीसाठी सुमारे साडेचार किलोमीटर क्षेत्रात जाळे टाकून असल्याने ते गुंडाळून घायला पाच तास आणि परत येण्यासाठी किमान दोन आणखी तास लागतील असे ही लिओ कोलासो यांनी सांगितले.

आज सकाळी एक संशयास्पद बोट आढळली असल्याची माहिती समोर आल्याने सगळीकडे खळबळ उडाली होती. त्यांनतर नौदल आणि तटरक्षक दलाचे अधिकारी या बोटीचा शोध घेत होते. आज सकाळी ८.३० ते ९ वाजण्याच्या सुमारास बोट दिसल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. ही बोट नौदलाच्या हद्दीत आढळली. त्यामुळे नौदलाकडून कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले होते. या बोटीमध्ये पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली होती आणि अनेक तर्क लढवले जात होते.

हे ही वाचा : 

संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी; मोबाईलवर आला मेसेज!

प्रेमाच्या ‘सरी’ची ‘संमोहिनी’, रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

IPL 2023 : आज रंगणार दोन सामने! ‘हे’ संघ येणार आमने-सामने

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version