spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ambabai, पुरातत्त्व खात्याकडून अंबाबाईच्या मूर्तीची छेडछाड? पुजाऱ्यांचा वकिलांचा गंभीर आरोप

केंद्रीय पुरातत्व विभागाच्या (Archaeological Department) अधिकाऱ्यांकडून काेल्हापूरच्या अंबाबाई (kolhapur ambabai) मूर्तीशी छेडछाड केल्याचा गंभीर आरोपपुजारी गजानन मुनीश्‍वर यांचे वकिल गांधी यांनी केला आहे.

केंद्रीय पुरातत्व विभागाच्या (Archaeological Department) अधिकाऱ्यांकडून काेल्हापूरच्या अंबाबाई (kolhapur ambabai) मूर्तीशी छेडछाड केल्याचा गंभीर आरोपपुजारी गजानन मुनीश्‍वर यांचे वकिल गांधी यांनी केला आहे. श्री अंबाबाई मूर्तीची झीज झाल्याचे समोर आल्यानंतर राज्य पुरातत्त्व विभागाकडून पाहणी करण्यात आली होती. केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून काल काेल्हापूरच्या अंबाबाई (kolhapur ambabai) मूर्तीची पाहणी केली होती. मात्र, विभागाने पाहणी करताना अंबाबाईच्या मूर्तीशी छेडछाड झाल्याचा आरोप श्री पूजकांच्या वकिलांनी केलाय. लेपचा काही थर काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचे वकिलांनी आपल्या याचिकेत म्हंटल आहे.

 

राज्य पुरातत्त्व विभागाच्या (Archaeological Department) अधिकाऱ्यांनी २८ फेब्रुवारी रोजी अंबाबाई मूर्तीची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी याबाबतचा अहवाल पाठवल्यानंतर केंद्रीय पुरातत्त्वची पाहणी झाली आहे. या संदर्भातील अहवाल केंद्रीय पुरातत्त्व विभाग लवकरच सादर करणार आहे. पाहणीनंतर सद्यस्थितीत मूर्ती सुरक्षित असून काही प्रमाणात संवर्धनाची गरज भासल्यास त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहे,असं केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आलं असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा :

Maharashtra Kesari, महाराष्ट्रात रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

राज्य प्राथमिक शिक्षक संघाची सरकारी कर्मचारी संपातून माघार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

 

 

Latest Posts

Don't Miss