“शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर  सर्वांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार” Deepak Kesarkar यांची घोषणा

“शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर  सर्वांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार” Deepak Kesarkar यांची घोषणा

राज्यात मोठ्याप्रमाणावर शिक्षण बव्यवस्थे संदर्भात चर्चा होत होत्या. हा विषय अधिक समोर आला तो म्हणजे ‘जंगलात भरली प्राण्यांची मैफिल’ या पूर्वी भावे यांच्या कवितेमुळे. त्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. यावर दीपक केसरकर यांनी उत्तर सुद्धा दिले होते. आता दीपक केसरकर यांनी एक नवा नियम लागू करण्याचे सांगितले आहे. शिक्षणाचा दर्जा हा अधिक चांगला व्हावा, या शिक्षणाचा मुलांना मोठ्याप्रमाणावर फायदा व्हावा या दृष्टीने यावेळी बरेचसे असे काही नवे बदल समोर येणार आहेत. याच संदर्भात दीपक केसरकर यांनी एका पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.

शिक्षणाचा दर्जा न सांभाळणाऱ्या शिक्षकांना आधी ६ महिने प्रशिक्षण देणार. त्यातूनही दर्जा सुधारला नाही तर अशा शिक्षकांचा ५० टक्के पगार कापणार. तरीही दर्जा सुधारला नाही तर सेवेतून कमी करणार असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. पुण्यात आयोजित शिक्षण परिषदेत ते बोलत होते.शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक, अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नेमकं काय म्हणालेत शिक्षणमंत्री ?

“शिक्षक समाधानी असतील तरच ते विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देऊ शकतील. पुढील काळात शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर  सर्वांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार आहे.  आठवीपर्यंत परीक्षा नाही यामुळे मुलं निर्धास्त राहतात. त्याला गणित, विज्ञान, इंग्रजी येतं की नाही याची चिंता कोणी करत नाही. यापुढे शिक्षकांना ही मुभा राहणार नाही. अनेक शिक्षकांना लाख, सव्वा लाख पगार असतो. मग मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आतापर्यंत ही जबाबदारी ठरवण्यात आली नव्हती,” असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “मी असंदेखील सर्क्युलर काढलं आहे की, ज्या शिक्षकांना शिकवता येत नसेल त्यांना ६ महिने पूर्ण पगार देऊन प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतरही बदल झाला नाही तर ५० टक्के पगार कमी करणार आणि तरीही बदल झाला नाही तर सेवेतून दूर करणार. सेवेतून दूर कऱणं हेतू नाही. मुलांचं शिक्षण हे शिक्षण खात्याचं अंतिम उद्दिष्ट होतं. आतापर्यंत हे शिक्षण नाही तर शिक्षक खातं होतं. त्यांच्या समस्या घेऊन सरकारकडे जात होते. त्यांच्या समस्या वर्षभरात सोडवण्यात आल्या आहेत. शिक्षकानं एकाच ठिकाणी राहून शिक्षणाचं काम कर्म करावं. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर भर, जे शिक्षक यात कमी पडतील त्यांच्यावर कारवाई करणार”.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या नेत्याने उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य करत म्हणाले… परमेश्वराने मुख्यमंत्रीपदाची संधी दिली…

Uddhav Thackeray Birthday Banner : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत जोरदार बॅनरबाजी, भावी मुख्यमंत्री…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version