Friday, July 5, 2024

Latest Posts

हे आपल्या देशावर किंवा क्रिकेटवरचे प्रेम नाही तर शुद्ध वेडेपणा, Team India Victory Parade वरून Satyajeet Tambe यांची टीका

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे (satyajeet Tambe) यांनी मुंबईत जमलेल्या क्रिकेट चाहत्यांच्या गर्दीवर भाष्य करत, "हे आपल्या देशावर किंवा क्रिकेटवरचे प्रेम नाही तर शुद्ध वेडेपणा आहे," असे ते म्हणाले.

टी २० वर्ल्डकप (T20 World Cup 2024) विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी परेडमध्ये (Team India Victory Parade)  लाखो मुंबईकरांनी मरिन ड्राईव्ह (Marine Drive) येथे अफाट गर्दी केली होती. विश्व विजेते झालेल्या आपल्या लाडक्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती. नरिमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेल पासून निघालेली हि विजययात्रा वानखेडे स्टेडियम (Wankhede Stedium) पर्यंत पोहोचली. वानखेडे स्टेडियम मध्येही चाहते दुपारपासूनच हजेरी लावून होते. संध्याकाळपर्यंत मरीन ड्राईव्ह परिसर आणि वानखेडे स्टेडियम हे क्रिकेट चाहत्यांनी तुडुंब भरले होते. यावर आता नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे (satyajeet Tambe) यांनी ताशेरे ओढले आहेत. मुंबईत जमलेल्या क्रिकेट चाहत्यांच्या गर्दीवर भाष्य करत, “हे आपल्या देशावर किंवा क्रिकेटवरचे प्रेम नाही तर शुद्ध वेडेपणा आहे,” असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे (मंगळवार, २ जुलै) एका सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे १२१ लोक मृत्युमुखी पडले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या गर्दीबाबत आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून त्यांनी टीका केली. यावेळी ते म्हणाले, “मुंबईला आणखी एक #HathrasHorror बनण्यापासून वाचवल्याबद्दल देवाचे आभार. हाथरसमध्ये १२१ जणांचा जीव गेल्याच्या एका दिवसानंतर वानखेडे स्टेडियमवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देऊन प्रशासन एवढा मोठा धोका कसा पत्करू शकते?” असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला आहे. पुढे क्रिकेट चाहत्यांच्या गर्दीवर भाष्य करत ते म्हणाले, “हे आपल्या देशावर किंवा क्रिकेटवरचे प्रेम नाही तर शुद्ध वेडेपणा आहे. अनागोंदी आणि बेपर्वाईला प्राधान्य देण्यापेक्षा सुरक्षितता आणि विवेकाला प्राधान्य देऊ या,” असे ते म्हणाले.

मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरात टी २० विश्वचषक जिंकून आलेल्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी सुमारे ३ लाख मुंबईकर उपस्थित होते. सुमारे ५ हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्याची फौज तैनात करण्यात आली होती. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, लाखोंच्या गर्दीमुळे काही ठिकाणी चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अतिप्रमाणात झालेल्या गर्दीमुळे काही नागरिकांना श्वसनाच्या समस्या देखील जाणवू लागल्या होत्या. यामुळे १० नागरिकांना जवालच्या सरकारी रुग्णालयात भरती केले गेले.

World Cup जिंकलोय तर आपण नाचायला पाहिजे, Rohit Sharma ने दिली मराठीतून प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss