बीडच्या पीक विमा घोटाळ्याचे तेलंगणात कनेक्शन

राज्यभरात शेतीचे नुकसान झाल्यानंतर त्यांना पीक विमा देण्यात येतो. मात्र या योजनेमध्ये मागील काही दिवसांपासून बीड (Beed) जिल्ह्यात सतत पीक विमा घोटाळ्याचे प्रकरण समोर येत आहेत.

बीडच्या पीक विमा घोटाळ्याचे तेलंगणात कनेक्शन

राज्यभरात शेतीचे नुकसान झाल्यानंतर त्यांना पीक विमा देण्यात येतो. मात्र या योजनेमध्ये मागील काही दिवसांपासून बीड (Beed) जिल्ह्यात सतत पीक विमा घोटाळ्याचे प्रकरण समोर येत आहेत. त्यातच आता बीड शहरात पीक विमा घोटाळ्याचे नवीन नवीन कारनामे बाहेर येत आहेत. बीड नगरपालिकेच्या जमिनीला गायरान जमीन दाखवून याच जमिनीचा ३० हजार रुपयांचा पिक विमा (Crop Insurance) भरण्यात आला आहे. पण यातील धक्कादायक बाब म्हणजे बीड मधील या पीक विमा घोटाळ्याचे थेट कनेक्शन तेलंगणापर्यंत असल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक जिल्ह्यात या घोटाळ्याचे संबंध आहेत.

शेतीचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पीक विमा योजना राबविण्यात येत आहेत. पण या योजनेमध्ये आता बोगस पीक विमा भरून लाभ घेणाऱ्यांची टोळी बीडमध्ये सक्रिय असल्याचे समोर आले आहे. यामध्ये नगरपालिका आणि एमआयडीसीची जागा ही गायरान जमीन दाखवून २६४ जणांनी बारा हजार हेक्टर जमिनीचा पिक विमा भरला आहे. आता हा सर्व प्रकार कृषी विभागाने महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा हा जिल्हा असून, याच ठिकाणी पीक विमा घोटाळ्याचे एकामागून एक प्रकरण समोर येत आहे. या प्रकारची भारतीय पीक विमा कंपनीकडून चौकशी होणार आहे. तसेच पीक विमा कंपनीच्या चौकशीमध्ये वेगवेगळे नवीन प्रकरणं बाहेर आली आहेत. तेलंगणा राज्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील काही व्यक्तींनी बीड नगरपालिकेची जागा गायरान जमीन दाखवून त्यावर विमा घेतला आहे. यामध्ये बोगस विमा काढणाऱ्यांची संख्या मोठी असून, ही रक्कम १२ कोटीच्या आसपास आहे.

राज्य सरकारने १ रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. याचाच फायदा उलट बीड मध्ये विमा संधर्भात घोटाळे होत आहेत. एमआयडीसी परिसरातील ४६७ एकर जमीन शेती असल्याचे दाखवून पीक विमा भरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. १८० लोकांच्या नावावर हा विमा भरण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी चालू आहे.

Exit mobile version