नाशिकमध्ये भीषण दुर्घटना!, मुख्यमंत्री घटनास्थळाकडे दाखल; पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

नाशिकमध्ये भीषण दुर्घटना!, मुख्यमंत्री घटनास्थळाकडे दाखल; पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

नाशिक मधल्या घडलेल्या घटनेनी आज पूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातानंतर बस पेटल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलविण्यात आली. यावेळी लहान बाळासह दोन मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा १३ वर गेला आहे. नाशिक बस अपघातानंतर पाहणी करण्यासाठी महारष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मी सर्व अधिकारी, प्रशासकीय वर्गाच्या संपर्कात आहे. जखमींचा जीव वाचवण्याचा प्राधान्य दिलं जाईल. काही जणांना खासगी रुग्णालयात दाखल केलंय त्यांच्यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करू.’ असंही शिंदे यांनी म्हटले आहे.

आज पहाटेच्या सुमारास नाशिक-औरंगाबाद रोडवर (Nashik Aurangabad Road) खाजगी बसला आग लागून १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही भीषण घटना घडली आहे. मिरची हॉटेल परिसरात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बसमधील काही क्षणात जळून खाक झाली आहे. दरम्यान, अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स बसमध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेले होते का? नेमका हा अपघात कशामुळे झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतल्याचे सांगितले जाते. अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हलची असल्याची प्राथमिक माहिती आहे. यवतमाळहून ही बस मुंबईला निघाली होती. पहाटे पाचच्या सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात तिला कोळश्याने भरलेल्या डंपरने धडक दिली. अपघातानंतर बसने पेट घेतला. गाठ झोपेत असणारे प्रवाशांचा अक्षरश कोळसा झाला. बसमध्ये २० ते २५ प्रवासी असल्याचा अंदाज आहे. काहींनी उड्या मारल्याने ते बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अर्धा ते पाऊण तास पेटलेली बस विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. मृत प्रवाशांचे मृतदेह मनपाच्या सिटीलिंक बसमधून हलविण्यात आले. आगीत बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला. बसमधील १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितले.

नाशिक बस अपघात दुर्घटनेबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी बी. गंगातरण यांनी माध्यमांना महत्वाची माहिती दिली आहे. पहाटे या खासगी बसचा अपघात होताच ट्रकच्या इंधनाच्या टाकीत हिट झाल्याने स्फोट झाला असल्याचं जिल्हाधिकारी म्हणालेत. तसेच या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांची ओळख पटू शकत नाही. DNA आणि ईतर फॉरेन्सिक टेस्ट केल्यानंतरच योग्य माहिती दिली जाईल, तसेच नातेवाईकांसाठी टोल फ्री नंबरची सुविधा देण्यात आली आहे. दरम्यान खासगी लक्झरी बसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन, आरटीओ सोबत चर्चा करून पुढील कारवाई करू असे जिल्हाधिकारी म्हणाले.

हे ही वाचा:

Covid19 Updates गणपती व नवरात्रोत्सवानंतर कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला, देशात नवीन कोरोनाबाधित नोंद तर,२४ रुग्णांचा मृत्यू

हॉट अन् बॉल्ड अभिनेत्री काव्या किरणचा टू पीस मधील हटके अंदाज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version