ठाणे महानगरपालिकेने केली धर्मवीर आनंद दिघेंची ‘ ही ‘ संस्था सील

महापालिकेच्या ३० कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता व्यायामशाळा थेट सील केली.

ठाणे महानगरपालिकेने केली धर्मवीर आनंद दिघेंची ‘ ही ‘ संस्था सील

ठाण्यातील एक प्रसिद्ध नाव असलेले आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे(Anand Dighe) यांनी २५ वर्षांपूर्वी ठाण्यातील तरुणांसाठी सावरकर नगर येथे व्यायाम शाळा सुरु केली होती. परंतु या व्यायाम शाळेला आता ठाणे महापालिकेने(Thane Municipal Corporation ) टाळे ठेकले आहे. या व्यायामशाळेचे सात महिन्यांचे भाडे थकल्यामुळे तसेच अनधिकृत बांधकाम केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे. मात्र, ही व्यायामशाळा चालवणारे शिवअभिमान व्यायाम मंदिर संस्थेचे अध्यक्ष राजू शिरोडकर हे शिवसैनिक असल्याने शिंदे गटाच्या दडपशाहीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

ठाण्याच्या सावरकर नगर या भागात २५ वर्षांपूर्वी एक हजार चौरस फुटांच्या जागेत आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या उपस्थितीत ही व्यायामशाळा सुरू झाली. या व्यायामशाळेची देखभाल शिवअभिमान व्यायाम मंदिर संस्थेच्या वतीने केली जाते. कोरोना संकटाच्या काळात व्यायामशाळेचे सात महिन्यांचे सुमारे ६५ हजार रुपये भाडे थकले होते.

त्यानंतर सहकाऱ्यांनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेत थकीत भाड्यापैकी १५ हजार रुपये भरले आणि उर्वरित रकमेसाठी १५ दिवसांची मुदत मागून घेतली होती. पण, भाडे भरून देखील महापालिकेच्या ३० कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता व्यायामशाळा थेट सील केली.

ठाकरे समर्थक म्हणून कारवाई केली असल्याचा आरोप देखील यावेळी शिरोडकर यांनी केला आहे. या वास्तूचे मुदत संपल्यामुळे व भाडे शिल्लक असल्यामुळे महापालिकेने ही व्यायामशाळा ताब्यात घेतली आहे. तर, पालिकेने दिलेल्या या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. असे पालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी महेश आहेर यांनी यांगीतले. तसेच आमच्यावर कोणतेही राजकीय दबाव नसल्याचे देखील ते म्हणाले.

हे ही वाचा:

Chup Free Screening : दिग्दर्शक आर बाल्की यांनी ‘चुप’ चित्रपटाच्या मोफत स्क्रिनिंगबद्दल दिली मोठी माहिती

कॉलेज होणार रॅगिंग फ्री; युजीसीकडून हेल्पलाईन नंबर जारी!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version