spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Thane : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महिला असुरक्षित ?

ठाण्यात रिक्षाचालकाकडून मुलीचा विनयभंग करण्यात आला, हा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. ठाण्याच्या स्टेशन रोड परिसरात एक रिक्षावाला एका शाळकरी मुलीला फरफटत नेत असल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

ठाण्यात रिक्षाचालकाकडून मुलीचा विनयभंग करण्यात आला, हा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. ठाण्याच्या स्टेशन रोड परिसरात एक रिक्षावाला एका शाळकरी मुलीला फरफटत नेत असल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येत आहे कि, ठाणे स्टेशन रोड परिसरात शाळकरी मुलगी रिक्षातून उतरली. पण नंतर रिक्षाचालकानं तिचा हात पकडून तसंच तिला काही अंतरापर्यंत फरफटत नेलं. यानंतर शाळकरी मुलगी रस्त्यावर खाली पडली. या सर्व प्रकारात शाळकरी मुलीला दुखापत झाली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी रिक्षाचालकाचा तपास सुरु आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत शाळकरी मुलगी जखमी झाली आहे. त्या मुलीला फरफटत नेण्यामागे त्या रिक्षावाल्याचा नेमका काय हेतू होता? याचा पोलीस तपास करत आहेत. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलीस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. तर सोशल मीडियावरुन मुख्यमंत्री शिंदेजी त्या रिक्षावाल्याला बेड्या ठोका अशी मागणी करण्यात येत आहे.

 मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातच महिला असुरक्षित असल्याचं धक्कादायक चित्र यामुळे समोर आले आहे त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच महिला असुरक्षित असल्याचं चित्र यामुळे समोर येत आहे.

हे ही वाचा:

भाजपला एकनाथ शिंदे सुद्धा नको; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

Andheri Bypoll Election 2022: वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा कुणाला, शिवसेना की भाजप? प्रकाश आंबेडकरांनी दिली प्रतिक्रिया….

… मला राजकारणात यायला आवडले नसते; राज ठाकरेंच्या पुत्राचे खळबळजनक वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss