कर्जत दिशेने जाणाऱ्या लोकलचे ५ डबे घसरले

रविवारी सुट्टीनिमित्त बाहेर जाण्याचा विचार आपण सगळेच करतो. आज मध्य रेल्वेकडून दोन मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे.

कर्जत दिशेने जाणाऱ्या लोकलचे ५ डबे घसरले

रविवारी सुट्टीनिमित्त बाहेर जाण्याचा विचार आपण सगळेच करतो. आज मध्य रेल्वेकडून दोन मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी लोकल रेल्वेने (Central Railway Megablock Today) प्रवास करणार असाल, रेल्वेचं वेळापत्रक पाहून आधी नियोजन करा. आज तांत्रिक काम आणि दुरुस्तीसाठी लोकलच्या मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेने प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.रविवार हा मेगाब्लॉक चा असतो.

त्यातच आत्ता मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्टेशवरुन मोठी बातमी समोर येत आहे. अंबरनाथ स्टेशन रुळावरून कर्जत च्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे दोन डबे घसरले. पावसाळा अजून जोरदार सुरवात झाली नसून देखील रेल्वे संदर्भात दुर्घटना होण्यास सुरवात झाली आहे. हाती आलेल्या माहित नुसार जीवित हानी बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तरी हा अपघात किंवा ही दुर्घना कशी घडली या संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतूक ही सावकाश गतीने सुरु आहे. त्याचबरोबर मेगा ब्लॉक असल्या कारणाने रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या धावत असल्या तरी देखील रेलवे च्या दुर्घटनेमुळे गाड्या या अधिकच उशिराने धावल्या जाणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार स्लाईडिंग ला गाडी जात असताना रेलवे रुळावरून तब्ब्ल ५ डबे हे घसरले आहेत. त्यामुळे कर्जत च्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे या बंद आहेत तर सी एस ती च्या दिशेने जाणाऱ्या रेलवे या हळू गतीने चालवण्यात येत आहे.

तसेच आजचा मेगाब्लॉक हा ठाणे – कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी१०. ४० ते दुपारी ३. ४० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी ९. ३० ते दुपारी २. ४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. कल्याण येथून सकाळी १०. २८ ते दुपारी ३. २५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील त्यानंतर मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर १० मिनिटे उशिराने पोहोचेल.

तर हार्बर मार्गावर मेगाब्लॉक पनवेल – वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११. ०५ ते सायंकाळी ४. ०५पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे बेलापूर/नेरुळ-खारकोपर रेल्वे सेवा प्रभावित होणार नाही. पनवेल येथून सकाळी १०. ४९ ते दुपारी ३. ४९ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९. ४५ ते दुपारी ३. १२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी ११. ०२ ते दुपारी ३. २५ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १० ०१ ते दुपारी ३. २५ वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.

हे ही वाचा:

Sri Lanka विरुद्ध Pakistan कसोटी सामन्यामध्ये मिळाले २१ वर्षीय खेळाडूला स्थान

संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version