ठाण्यात २४ वर्षाच्या मुलावर तब्बल २१ गुन्हे

इराणी गँगमधील २४ वर्षाच्या मुलाला मानपाडा गुन्हे शाखेतील पोलिसांनी शहाड परिसरात पकडले. या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता आणि या पोलिसांच्या युक्तीला अखेर यश आले आणि हा मोरक्या पोलिसांच्या हाती लागला.या इराणी गँगच्या मोरक्यावर २४ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले.त्यातील १३ गुन्ह्यातील लाखोंचा मुद्देमाल मानपाडा पोलिसांनी हस्तगत केला आहे.मुस्तफा उर्फ मुस्सू जाफर सैयद उर्फ इराणी, हे या मुलाचे नाव असून असून तो केवळ २४ वर्षांचा आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठी इराणी वस्ती कल्याण – कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकाला लागूनच आहे. या वस्तीतील अनेक इराणी गुन्हेगारांना पोलीसानी पकडले आहे. मात्र अजूनही इराणी वस्तीला अनेक इराणी गुन्हेगारांचा खुलेआम वावर असल्याचे दिसून आले आहे. अश्यातच मानपाडा पोलीस ठाण्याच्या जागेतील भोपर रोड नांदीवली पूर्व येथे राहणारे शरद पुंडलीक कडुकर हे ३ जून २०२३ रोजी सकाळी ७ वाजल्याच्या सुमारास भोपर कमाणी जवळी पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने पाठीमागे येवून त्यांच्या हातातील महागडा मोबाईल जबरदस्तीने खेचून घेतला व दुचाकीवरून तो पळून गेला.

या घटनेनंतर कंडुकर त्यांनी झाल्याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा गुन्हा कलम ३९२ , ३४ प्रमाणे लावण्यात आला. या चोराला पकडण्यासाठी पोलिसांद्वारे एक पथक बनवण्यात आले.गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे आणि सुनिल तारमळे यांना एक गुप्त माहिती मिळाली. या मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी कल्याण पश्चिम भागातील शहाड या भागात सापळा रचला होता.त्यावेळी पोलसांना एकावर संशय आल्याने त्यांनी त्याच्यवर झडप घातली व त्याची विचारपूस केली.ही विचारपूस करत असताना त्याने पोलीस पथकाला गुन्ह्याची कबुली दिली. आता पोलीस अटक केलेल्या मोरक्याच्या साथीदारांचा शोध घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कु-हाडे यांनी दिली आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलीस तपासात या २४ वर्षीय मोरक्यावर आतापर्यंत २१ गुन्हे दाखल केले असल्याची माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेकडून जाहिरातबाजी : कोणता नेता आहे अधिक लोकप्रिय ?

Raj Thackeray Birthday Special: Raj Thakare आणि Sonali Bendre यांचे होते प्रेम प्रकरण ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version