भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

आज भिवंडीमध्ये एक मोठी आणि दुर्दैवी घटना घडली आहे. भिवंडीतील वलपाडा येथे एक ३ मजली इमारत कोसळली आहे.

भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

आज भिवंडीमध्ये एक मोठी आणि दुर्दैवी घटना घडली आहे. भिवंडीतील वलपाडा येथे एक ३ मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवित हानी ही झाली तर नाही परंतु ६० ते ७० नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती मोठ्या प्रमाणत आहे. या संपूर्ण घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ हि उडाली आहे.

आज दिनांक २९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भिवंडी मध्ये एक मोठी घटना घडली. या घटनेमध्ये एक ३ मजली इमारत अगदी पत्त्याच्या इमारती झाली कोसळली आहे. या संपूर्ण अपघातात सुमारे ५०-६० नागरिक अडकल्याची भीती देखील वर्तवली जात आहे. घटनासाठीली अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिस त्वरित पोहचले आहे. मोठ्या शर्तीने बचाव कार्य हे सुरु आहे. इमारतीचा ढिगारा उपसला जात असून त्याखालून लोकांना काढलं जात आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. ही इमारत जुनी असल्याचं सांगितलं जात आहे.

भिवंडीच्या वलपाडा येथे वर्धमान नावाची ही इमारत आहे. ही तळमजला अधिक तीन मजली इमारत आहे. तसेच या इमारतीच्या खाली गोडाऊन होता. तर इमारतीच्या वरच्या तिन्ही मजल्यावर लोक राहत होते. या गोदामात सुमारे ३० ते ३५ लोक काम करत असल्याची माहिती मिळते. तर इमारतीत देखील नागरी त्यांच्या त्यांच्या घरात होते. त्यामुळे या ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून ढिगारा बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं जात आहे. आतापर्यंत किती जखमी झाले? या दुर्घटनेत किती दगावले? याची माहिती मिळू शकली नाही.

हे ही वाचा : 

भाजपला सुचले तीन वर्षांनंतर शहाणपण, राऊतांची बोलंदाजी निष्प्रभ करण्यासाठी ‘राणेस्र’

बारसू रिफायनरी प्रकल्पाला अजित पवार यांची भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version