Friday, September 27, 2024

Latest Posts

आज रात्रीपासून हार्बर रेल्वे मार्गावर ३८ तासांचा मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई मधील हार्बर रेल्वे मार्गावर आज रात्रीपासून ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक बेलापूर आणि पनवेल दरम्यान ३० सप्टेंबर रात्री ११ वाजल्यापासून ते २ ऑक्टोबर दुपारी १ वाजेपर्यंत असणार आहे.

मुंबई मधील हार्बर रेल्वे मार्गावर आज रात्रीपासून ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक बेलापूर आणि पनवेल दरम्यान ३० सप्टेंबर रात्री ११ वाजल्यापासून ते २ ऑक्टोबर दुपारी १ वाजेपर्यंत असणार आहे. या मेगाब्लॉक मध्ये हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर बेलापूर आणि पनवेल स्टेशनची उपनगरीय रेल्वे सेवा बंद असणार आहे. पनवेलवरुन सीएसएमटीकडे जाणाऱ्या तसेच येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात उपनगरीय रेल्वेने प्रवास करत असला तर मेगाब्लॉकचं वेळापत्रक बघूनच घरा बाहेर पडा.

हार्बर रेल्वे मार्गावर आज रात्रीपासून ब्लॉक घेण्यात येणार आहे. मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या कामासाठी ३८ तासांचा ब्लॉक हार्बर रेल्वे मार्गावर घेण्यात येणार आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या दोन नवीन अप आणि डाऊन मार्गिकांच्या बांधकामाबरोबरच पनवेल उपनगरीय रिमॉडेलिंग कामासाठी बेलापूर-पनवेलदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यान रेल्वे वाहतूक सेवा बंद असणार आहे. हार्बर मार्गावर अप आणि डाऊन उपनगरीय सेवा बेलापूर, नेरुळ आणि वाशी स्टेशनपर्यंत चालवल्या जातील. ट्रान्सहार्बर मार्गावर अप आणि डाऊन उपनगरीय सेवा केवळ ठाणे आणि नेरुळ/वाशी स्टेशनदरम्यान सुरु असणार आहेत. हा मेगाब्लॉक सुरु होण्याआधी ट्रान्सहार्बर मार्गावर अप आणि डाऊन उपनगरीय सेवा केवळ ठाणे आणि नेरुळ/वाशी स्टेशनदरम्यान सुरु राहिल.सीएसएमटीहून पनवेलसाठी शेवटची लोकल रात्री ९ वाजून २ मिनिटांनी सुटणार आहे. सीएसएमटीहून सुटलेली ही लोकल रात्री १० वाजून २२ मिनिटांनी पनवेल स्थानकात पोचेल. तसेच अप हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल शनिवारी रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी सुटणार आहे. ही लोकल सीएसएमटीला ११ वाजून ५४ मिनिटांनी पोचणार आहे. यानंतर लोकल सेवा बंद राहणार आहे.

हार्बर लोकल मार्गावर ३८ तासांचा मेगाब्लॉक असल्यामुळे मध्य रेल्वेवर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक नसेल. गणेशोत्सव सणानिमित्त मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ब्लॉक घेतलेला नव्हता.सीएसएमटीहून पहिली लोकल १२ वाजून ०८ मिनिटांनी रवाना होईल, जी ०१. २९ वाजता पनवेलला पोहोचेल.पनवेलहून सीएसएमटीसाठी पहिली लोकल ट्रेन ०१. ३७ मिनिटांनी रवाना होईल. ही ट्रेन २. ५६ वाजता सीएसएमटीला पोचणार आहे. ठाण्याहून पनवेलला पहिली लोकल ट्रेन ०१. २४ मिनिटांनी रवाना होईल, जी ०२. २६ मिनिटांनी पनवेलला पोचेल. पनवेलहून ठाण्याला पहिली लोकल ट्रेन ०२. ०१ वाजता रवाना होईल आणि ०२. ५४ वाजता ठाण्याला पोचणार आहे.

हे ही वाचा: 

नवरात्रीच्या उपवासात कोणते पदार्थ खावे, कोणते खाऊ नये जाणून घ्या सविस्तर माहिती

व्यायामादरम्यान हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी या ५ गोष्टी करा आवर्जून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss