Mira Road मध्ये घडली धक्कादायक घटना, प्रेयसीचे तुकडे केले अन् कुकरमध्ये…

दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखंच हत्याकांड मीरारोडमध्ये घडलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हा हादरून गेला आहे.

Mira Road मध्ये घडली धक्कादायक घटना, प्रेयसीचे तुकडे केले अन् कुकरमध्ये…

दिल्ल्लीपाठोपाठ आता मुंबईमध्ये देखील महिलांसंदर्भात अनेक धक्कदायक घटना या घडत आहेत आहे. काल दिनांक ६ जून रोजी चर्चगेट परिसरात मुलींच्या वसतिगृहात एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली तर आज दिनांक ८ जून रोजी आणखी एक धक्कदायक बाब ही अमोर आली आहे. दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखंच हत्याकांड मीरारोडमध्ये घडलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हा हादरून गेला आहे.

मुंबईतील मीरा रोड परिसरात एका ५६ वर्षीय व्यक्तीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या रूम पार्टनरची निर्घृण हत्या केली आहे. आणि नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये टाकून उकळले आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करत होता. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आणि घरातून हत्येसाठी वापरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही सर्व घटना मीरा भाईंदर उड्डाणपुलाजवळील गीता नगर फेज-७ मध्ये घडली आहे. ५६ वर्षीय मनोज साने आणि त्यांची रूम पार्टनर ३२ वर्षीय सरस्वती वैद्य एकत्र राहत होते. हे जोडपे गेल्या ३ वर्षांपासून येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. बुधवारी दिनांक ७ जून रोजी रात्री या इमारतीत राहणाऱ्या शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागली, त्यानंतर त्यांनी नयानगर पोलिस ठाण्यात माहिती दिली.

या सर्व प्रकरणी नयानगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घरात घुसल्यानंतर हा प्रकार नयानगर पोलिसांना समजला. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे केले होते. मृतदेहाचे सर्व तुकडे कटर मशीनने कापण्यात आले. पोलिसांनी हत्येच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. आरोपीने केलेले तुकडे कुकरमध्ये उकळले आणि मग मिक्सरमध्ये टाकून , बारीक केले आणि मग फेकले. आरोपींनी काही भाग सोसायटीच्या मागील गटारातही टाकला. शरीराचे अवयव फेकण्यासाठी त्याने दुचाकीचा वापर केला.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, राहुल नार्वेकर म्हणाले…

Biporjoy वादळाचा वाढता धोका! पुढील २४ तासांत दिसू शकते रौद्र रूप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version