रील बनवताना तरुण पडला विहिरीत; ३२ तासांच्या शोधा नंतर…

सध्या सोशल मीडियाचा प्रचंड वापर वाढला आहे. दिवसेंदिवस रील बनवण्याचा ट्रेंड (Trend) वाढत चालला आहे. काहीतरी वेगळं करून रील बनवण्यासाठी आजकालचे युवक आपला जीवही धोक्यात घालत आहेत. रील बनविण्याच्या नादात तरुणांना अखेर त्यांचा जीवही गमवावा लागतो.

रील बनवताना तरुण पडला विहिरीत; ३२ तासांच्या शोधा नंतर…

सध्या सोशल मीडियाचा प्रचंड वापर वाढला आहे. दिवसेंदिवस रील बनवण्याचा ट्रेंड (Trend) वाढत चालला आहे. काहीतरी वेगळं करून रील बनवण्यासाठी आजकालचे युवक आपला जीवही धोक्यात घालत आहेत. रील बनविण्याच्या नादात तरुणांना अखेर त्यांचा जीवही गमवावा लागतो. अशीच एक घटना डोंबिवलीत देखील घडली आहे. डोंबिवलीच्या ठाकुर्ली येथे ठाकुर्ली पंपहाऊस या ठिकाणी तरुणाचा रील बनवत असताना विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाच्या साहाय्याने त्या तरुणाचा शोध घेतला. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने तब्बल ३२ तासानंतर तरुणाचा मृत्यू शोधण्यात अग्निशमन दल यशस्वी ठरले.

ठाकुर्ली येथे पंपहाऊस मध्ये एका १८ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव हे बिलाल सोहिल शेख असे आहे. मुंब्रा येथे राहणारा हा युवक आपल्या दोन मित्रांसोबत शहरीवरी संध्याकाळी रील बनविण्यासाठी डोंबिवली जवळील ठाकुर्ली पंपहाऊस या ठिकाणी गेला होता . बिलाल सोहिल शेख हा रील बनवत असताना विहिरीत पडला. बिलाल सोबत असलेल्या दोन मित्रांनी ही घटना विष्णूनगर पोलिसांना सांगितली. पोलिसांना व अग्निशमन दलाला माहिती मिळताच तातडीने तरुणांच्या शोध कार्यास सुरुवात केली. मात्र तब्बल ३२ तासानंतर या तरुणाच्या मृतदेहाचा शोध लागला आणि अखेर विहिरीतून या तरुणाचा मृतदेह काढण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना व पोलिसांना यश आले.

आपल्या दोन मित्रांसह बिलाला ठाकुर्ली येथे पंपहाऊसवर रील बनवण्यासाठी शारिनरी संध्याकाळी गेला होता. रील बनवत असताना त्याचा तोल जाऊन विहिरीत पडला. ही घटना घडल्यानंतर तरुणाच्या दोन्ही मित्रांनी ताबडतोब जवळच्या रेल्वे सुरक्षा बलाकडे धाव घेतली. माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाने विष्णूनगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांकडून या घटनेची माहिती नंतर डोंबिवली पश्चिमेकडील अग्निशामक दलाला देण्यात आली. अधिकारी रामचंद्र महाला, विनय कोयंदे , राजेश कासवे, केदार मराठे, महिला कर्मचारी या पथकांनी घटनास्थळी तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. हे शोधकार्य तब्बल ३२ तास सुरु होते. अग्निशामक दलाला सोमवारी संध्याकाळी बिलाला या तरुणाचा शोध घेण्यास यश आले. दरम्यान विहीर अत्यंत खोल असून त्यात प्रचंड गाळ असल्याचे सांगण्यात आले. आणि याच कारणामुळे शोधकार्यात बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या. म्हणूनच युवकाचा मृतदेह शोधण्यात विलंब झाला असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

हे ही वाचा:

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत मिळणार

मुंबई, ठाणे ,पालघरसह वसईमध्ये देखील पावसाने लावली हजेरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version