अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर… पोलिसांची पहिली पत्रकार परिषद म्हणाले…

बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना काल (सोमवार, २३ सप्टेंबर) घडली.

अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर… पोलिसांची पहिली पत्रकार परिषद म्हणाले…

Akshay Shinde Encountar: बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना काल (सोमवार, २३ सप्टेंबर) घडली. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावत तीन राउंड फायर केले. यादरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याप्रकरणात विरोधकांनी संशय व्यक्त करत सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. या सर्व प्रकरणानंतर आता पोलिसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी याप्रकरणातील अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला. तसेच सध्या या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून केला जात आहे, असेही पोलिसांनी सांगितले. काल जी घटना घडली आहे, त्याबद्दल एक अपडेट देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे. काल बदलापुरातील बाल लैंगिक अत्याचारातील अटक आरोपी अक्षय . शिंदे याच्याविरुद्ध बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. अक्षय शिंदेंच्या पत्नीने त्याच्या विरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.

या तपास पथकातील अधिकारी काल न्यायालयाचे ट्रान्सफर वॉरंट घेऊन कायदेशीररित्या आरोपीचा ताबा घेण्यासाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात गेले होते. तिथून त्याला घेऊन येत असताना या आरोपीने पोलिसांचे पिस्तुल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना जी घटना घडली, त्याबद्दल मुंब्रा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार २६२, १३२, १०९, १२१ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आरोपीच्या मृत्यूनंतर अकस्मात मृत्यू प्रकरण दाखल करण्यात आलं आहे. या दोन्हीही प्रकरणाचा तपास ठाणे पोलीस आयुक्त करत आहेत, असेही ठाणे पोलीस यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रामदास आठवले यांची पहिली प्रतिक्रिया, संजय राऊतांवर बोचरी टीका करत म्हणाले…

Akshay Shinde चा घात की घातपात? एन्काऊंटरची स्क्रीप्ट कोणाची?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version