Anand Dighe यांच्या आनंद आश्रमात नोटांची उधळण, व्हिडीओ आला समोर; बार मध्ये पैसे उधळतात तसे पैसे उधळले गेले: Sanjay Raut

Anand Dighe यांच्या आनंद आश्रमात नोटांची उधळण, व्हिडीओ आला समोर; बार मध्ये पैसे उधळतात तसे पैसे उधळले गेले: Sanjay Raut

Thane: शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रम धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून गणेशोत्सव कार्यक्रमानिमित्त ढोलताशा पथकावर चक्क पैशांची उधळण करण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत असून शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) नेते आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला असून आता यावरून राजकारण तापल्याचे दिसत आहे. केदार दिघे यांनी ट्विटरवरून सदर व्हिडीओ शेअर करत, “तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या… दिघेसाहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले… आमचा आनंद हरपला !” अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावरून नवा वाद निर्माण झाला असून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यावर आता शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संजय राऊत यांनी आज (शनिवार, १४ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत यावर भाष्य केले. ते म्हणाले, “विचलित करणारा तो व्हिडिओ आहे. पवित्र वास्तूत सगळ्यांनी पहिला तो व्हिडीओ. भ्रष्टाचार आणि लुटीतून आलेला पैसे तिथे उधळला गेला. पूर्वीचा आनंद आश्रम आता राहिलाय का ? लुटीचा पैसा तिथे ठेवला जातोय. दिघे असते तर भिंतीवर असलेला हंटर काढून त्यांना दाखविले असते. आनंद दिघे यांचा हा वारसा नाही. त्यांनी याचे समर्थन कधीच केले नसते. बार मध्ये पैसे उधळतात तसे पैसे उधळले गेले. राज्याला कलंक लावला, गुरुची अपकृती केली. त्यांचे चेले पैसे उधळत होते. धिंगाणा सुरू होता,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “कष्टाच्या पैशातून उधळण केली जात नाही. याची चौकशी झाली पाहिजे. आनंद दिघे यांच्या वास्तूत हे सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते मान्य आहे का ? दिघे साहेब असते तर फोडून काढले असते,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Nitesh Rane यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यावर Ambadas Danve यांचा टोला; गल्लीत डझनभर केळी विकत घेणे आणि देश चालवणे यात फरक…

गुलामीच्या खुणा पुसण्याचे काम PM Narendra Modi करत आहेत, Port Blair नामांतरावर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version