spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून तब्बल ४०० मुलांचं धर्मांतर

सध्या अनेक राज्यामध्ये धर्मावरुन वाद निर्माण होताना बघायला मिळत आहे. तसेच धर्माच्या नावावरून सातत्याने राजकीय आणि समाजिक वाद निर्माण करण्याचे प्रयत्न काही समाजकंटकांडून केला जातो.

सध्या अनेक राज्यामध्ये धर्मावरुन वाद निर्माण होताना बघायला मिळत आहे. तसेच धर्माच्या नावावरून सातत्याने राजकीय आणि समाजिक वाद निर्माण करण्याचे प्रयत्न काही समाजकंटकांडून केला जातो. प्रत्येक धर्म आणि जातीचे चांगले विचार आणि संस्कार असतात. प्रत्येकाला आपला धर्म हा श्रेष्ठ वाटत असतो आणि त्यात गैर काहीच नाही. हे सर्व धर्म मानवतेचाच संदेश देतात. पण हल्ली कट्टरता इतकी वाढत चाललीय की नको त्या विकृत घटना घडायला सुरुवात झाली आहे. मुंब्र्यातून अशी एक विक्षिप्त घटना समोर आली आहे.

ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून आरोपींनी थेट गेम खेळणाऱ्या शेकडो मुलांचं धर्मांतर केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतर केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंब्रा भागातील शाहनवाज मकसूद खान याने महाराष्ट्रातील मुलांना एक फेक यूजर आयडी बनवून संबंधित कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. तो गेम हरल्यावर कुराणमधील कलमा वाचण्यास सांगत होता. कुराणमधील कलमा वाचल्याने तुम्ही कधीही गेम हरणार नाहीत, असं सांगत असल्याची माहिती समोर आली आहे. खरं बघायला गेलं तर या घटनेची माहिती गाझियाबाद येथून समोर आली. परंतु या प्रकरणाचे धागेदोरे हे मुंब्र्यापर्यंत येऊन पोहोचले.

ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून ४०० जणांचं धर्मांतर करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित प्रकार हा गाझियाबादमध्ये उघडकीस आला. ऑनलाईन खेळाच्या नावाखाली धर्मांतर होत असल्याची बाब गाझियाबाद पोलिसांना समजतात त्यांनी एक पथक नेमलं. या पोलिसांच्या तपासात महत्त्वाची माहिती मिळाली. विशेष म्हणजे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्या आरोपीच्या माहितीनुसार दुसरा आरोपी हा ठाण्यातील मुंब्रा या विभागात असल्याचा खुलासा करण्यात आला. यानंतर गाजियाबादची एक टीम मुंब्रामध्ये दाखल झाली. स्थानिक मुंब्रा पोलिसांच्या मदतीने शहानवाज नामक आरोपीचा शोध सुरु झाला.

हे ही वाचा:

DRDO द्वारे ‘अग्नि प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

संन्यासी साधू करतात दिवसातून तीन वेळा स्नान; जाणून घ्या तीनवेळा स्नान करण्याचा लाभ..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss