गोळीबाराच्या घटनेतून पुन्हा एकदा Badlapur हादरलं,पैशाच्या वादातून झाला गोळीबार…

पैशाच्या वादातून एकाने आपल्या मित्रावरच गोळीबार केल्याची घटना समोर आली. त्यातील एकाने गोळीबार करत पळ काढला. मात्र रेल्वे प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या सुरक्षा बलाच्या जवानांनी आरोपीला पकडले.

गोळीबाराच्या घटनेतून पुन्हा एकदा Badlapur हादरलं,पैशाच्या वादातून झाला गोळीबार…

गुरुवारी (दि.५ ऑगस्ट) सायंकाळी बदलापूर (Badlapur) रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवर गोळीबाराचे थरारक दृश्य पाहायला मिळाले. पैशाच्या वादातून एकाने आपल्या मित्रावरच गोळीबार केल्याची घटना समोर आली. त्यातील एकाने गोळीबार करत पळ काढला. मात्र रेल्वे प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या सुरक्षा बलाच्या जवानांनी आरोपीला पकडले.

बदलापूर रेल्वे स्थानकात झालेल्या गोळीबार प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेबाबत रेल्वे डीसीपी मनोज पाटील (Manoj Patil) यांनी माहिती दिली की, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बदलापूर स्थानकातील रेल्वे प्लॅटफॉर्मवर चौघे मित्र आले. पैशाच्या वाटपावरून त्यांच्यात वाद झाला व त्यातून फायरिंगची घटना घडली, चौघेही आरोपी रेकॉर्डवरील आरोपी आहेत. गोळीबार करणाऱ्या विकास पगारे (Vikas Pagare) नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्यावर दोन गुन्हे टिटवाळा पोलीस ठाणे, दोन गुन्हे उल्हासनगरमध्ये दाखल आहेत. पैशांच्या देवाण-घेवाण आणि पैशांच्या वाटपावरून अचानक त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादाचे परिणाम गोळीबारात झालं. दोन राऊंड फायर करण्यात आले असून त्याने बंदूक कुठून आणली याचा तपास सुरू आहे.

गोळीबाराचा आवाज होताच रेल्वे स्थानकात एकाच पळापळ होऊन प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. तर दुसरीकडे एका आरोपीने गोळीबार करत तो रेल्वे रुळावरून धावत असताना त्याच्या हातातील बंदूक रुळावरच पडली. त्यामुळे इतर प्रवाशांनी एकत्र येत त्याला पकडून रेल्वे पोलीसांच्या ताब्यात दिले.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde यांच्या हस्ते मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे “मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष” लोकार्पण सोहळा संपन्न

Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version