spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जिल्ह्यामधील धोकादायक इमारतींमधून नागरिकांचे स्थलांतर करण्यात यावे – पालकमंत्री शंभूराजे देसाई

पावसाने सर्व राज्यांमध्ये धुमाकूळ घातला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा इशारा देत जिल्ह्यातील सर्व अतीधोकादायक इमारतींमध्ये राहत असलेल्या नागरिकांचे तातडीने स्थलांतर करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

पावसाने सर्व राज्यांमध्ये धुमाकूळ घातला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा इशारा देत जिल्ह्यातील सर्व अतीधोकादायक इमारतींमध्ये राहत असलेल्या नागरिकांचे तातडीने स्थलांतर करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची व्यवस्था समाज मंदिर, जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच कमतरता भासल्यास मंगल कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात यावी. अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या वेळांमध्ये सुसूत्रता आणावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थिती व त्यावरील उपाययोजना याविषयीचा आढावा घेण्यासाठीची बैठक शनिवारी ठाणे जिल्हा नियोजन भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. आपत्तीचा कोणताही प्रसंग उद्भवल्यास त्या ठिकाणी नागरिकांना तातडीने मदत पोहोचण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचा आढावा घेऊन त्याविषयी आवश्यक त्या उपाययोजना लगेच कराव्यात. आरोग्य विभागाने साथीचे रोग पसरू नयेत, याची सर्वोतोपरी काळजी घ्यावी. आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना सुखरूपपणे राहता यावे, यासाठी जे निवारा केंद्र स्थापित करण्यात आलेली आहेत, ते निवारा केंद्र सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी तसेच त्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा असाव्यात, याकडेही लक्ष देण्याचा सूचना यावेळी त्यांनी केल्या.

त्याचबरोबर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजसंबंधी उद्भवणाऱ्या अडचणींना तात्काळ प्रतिसाद द्यावा. गरजेच्या वेळी लागणाऱ्या आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता कायम सज्ज ठेवावी, असेही ते म्हणाले. तसेच यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांप्रमाणे नदी खोलीकरण, निवारा केंद्रांची दुरुस्ती, साकव दुरुस्ती इत्यादी विषयांबाबतच्या कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने शासनाकडे पाठवावेत. शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर सध्या जिल्ह्यात ३५० स्थलांतरित नागरिक तात्पुरत्या निवारा केंद्रात राहत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा:

अश्विनने या खेळाडूला मागे टाकत केला नवीन विक्रम

Fitness Trainer Death, २१० किलो वजन उचलताना एका ३३ वर्षीय फिटनेस ट्रेनरचा मृत्यू

गणपती स्पेशल रेसिपी: घरीच बनवा बाप्पासाठी मोदक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss