spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Belapur इमारत दुर्घटनेतील नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याच्या CM Shinde यांच्या मनपा आयुक्तांना सूचना

शहाबाज गाव, सेक्टर १९, बेलापूर (Belapur) येथे एक इमारत कोसळून आज  पहाटे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. इमारत दुर्घटनेत सापडलेल्या आपत्तीग्रस्तांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी महानगरपालिका आयुक्तांना दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे निती आयोगाच्या बैठकीसाठी सध्या दिल्ली येथे आहेत. बैठकीला जाण्यापूर्वी तेथूनच त्यांनी महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे (Kailas Shinde) यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून इमारत दुर्घटनेसंदर्भात माहिती घेतली. इमारत दुर्घटनेनंतर प्रशासनामार्फत तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या सर्व आपत्तीग्रस्तांना तातडीचे उपचार, आरोग्य सुविधा, अन्नपाणी, कपडे, तात्पुरता निवारा आदी आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात. महानगरपालिका आणि इतर सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी या आपत्तीग्रस्तांना आवश्यक ते सहाय्य तातडीने उपलब्ध करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत. 

बेलापूर विभागातील शहाबाज गावातील इंदिरा निवास ही तीन मजली इमारत पहाटे चार वाजून ३५ मिनिटांनी ढासळली असून यामध्ये दोन नागरिक अडकल्याचे समजते. इमारतीला अगोदर हादरे बसले त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक पटापट बाहेर पडले मात्र दोन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती हाती आली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन अग्निशमन दलाचे जवान पालिकेचे कर्मचारी अधिकारी दाखल झाले असून दोघांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. प्रत्यक्षदर्शी आणि इमारतीतील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास इमारतीतील नागरिक झोपेत असतानाच इमारत कोसळली. त्याआधी बिल्डिंगला हादरे बसले. तेव्हा लोक पटापट इमारतीमधून बाहेर पडले. त्यानंतर पत्त्यासारखी इमारत जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळाली. बिल्डिंग कोसळण्याआधीही नागरिक लोक बाहेर आले असले तरी दोघांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे ते ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांचे बचावकार्य सुरु आहे.

हे ही वाचा:

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर, बचाव कार्य सुरू CM Shinde यांची माहिती

Olympics 2024 : भारताने उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेशन, महिलांनी दमदार कामगिरीने जिंकली मनं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss