Thursday, July 4, 2024

Latest Posts

CM Shinde यांचे आदेश…ठाण्यात अनधिकृत बारवर महापालिकेची कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना तेथील अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामे बुलडोझर लावून नष्ट करण्याचे आदेश दिले होते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे येथे अनधिकृत बार आणि पबवर ठाणे महापालिका आणि पोलीस आयुक्त यांनी संयुक्तिकरीत्या कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कल्याण, भिवंडी, मीरा भाईंदर परिसरात देखील अशाच पद्धतीची कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आज २७ जून रोजी ठाण्यातील मयुरी बार, खुशी बार तसेच कोठारी कंपाउंड येथे कारवाई करण्यात आली. याआधी अनेक वेळा विविध ठिकाणी तक्रारी आल्या होत्या. पूर्वी देखील अशा पब, बारवर कारवाई केली होती. मात्र आता पुन्हा एकदा कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनधिकृत पद्धतीने बांधलेल्या बार वर पोलिस व महापालिका संयुक्तरित्या कारवाई करत आहे. नऊ प्रभागांमध्ये ही कारवाई सुरू आहे. तरुण पिढी पब व बार या गोष्टीकडे आकर्षित होते. कल्याण, भिवंडीतील अनधिकृत पब व बारवर देखील कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा आणि कॉलेजच्या शंभर मीटरच्या परिसरात ज्या अनधिकृत टपऱ्या आहेत त्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती संबंधित पोलिस अधिकारी व महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. वागळे इस्टेट, वर्तक नगर येथे असलेल्या बारवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. पाच जेसीबीच्या साहाय्याने ही कारवाई केली जात आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करावी. तसेच शहरातील अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांना दिले.

पुण्यात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना तेथील अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामे बुलडोझर लावून नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे शहरामध्ये या संदर्भात व्यापक कारवाया करण्यात आल्या. आता तशाच पद्धतीने ठाणे शहर आणि मीरा-भाईंदर शहरातील अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामे ही बुलडोझर लावून नष्ट करण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. अमली पदार्थामुळे तरुणाईचे मोठे नुकसान होत आहे. हा विळखा तातडीने रोखणे महत्त्वाचे आहे. यासाठी अत्यंत कडक उपाय योजण्यात यावेत. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरु करावी. शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

हे ही वाचा:

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! हार्बर चा प्रवास आता जलद होणार..

Rohini Khadse यांच्या ‘बदाम ‘टीकेला Chandrakant Patil यांचं दिमाखदार उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss