spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अग्निशमन सेवा सप्ताहास आरंभ, आयुक्त अभिजीत बांगर यांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली

Thane : अग्निशमन दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने सेवा सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाचा आरंभ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून करण्यात आला. त्या निमित्ताने ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी बाळकूम अग्निशमन केंद्रात शहीद स्तंभाला अभिवादन केले.

Thane : अग्निशमन दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने सेवा सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाचा आरंभ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून करण्यात आला. त्या निमित्ताने ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी बाळकूम अग्निशमन केंद्रात शहीद स्तंभाला अभिवादन केले. या प्रसंगी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त प्रशांत रोडे, अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके आदी उपस्थित होते. याचवेळी, महाराष्ट्र फायर सर्व्हीस असोसिएशनच्या देणगी पेटीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अग्निशमन सेवा सप्ताहाची पार्श्वभूमी

१४ एप्रिल १९४४ रोजी लंडनहून कराची मार्गे मुंबईत गोदीत दाखल झालेल्या ‘एस.एस.फोर्ट स्टिकींग’ या जहाजाचा स्फोट होउन भीषण आग लागली. या आगीशी झुंज देताना अग्निशामक दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या दिवसाचे स्मरण म्हणून अग्निशमनाचे कार्य करताना प्राणाची आहुती देणाऱ्या अग्निशमन सेवेतील शहिदांच्या कर्तव्याची जाणीव व प्रेरणा देणाऱ्या सर्व हौतात्म्यांना या दिवशी संपूर्ण भारतात श्रद्धांजली अपर्ण केली जाते. आगीच्या धोक्या संबंधात जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुचनेनुसार दरवर्षी १४ ते २० एप्रिल या कालावधीत संपूर्ण देशात ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ व १४ एप्रिल रोजी अग्निशमन सेवा दिन साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने १४ एप्रिल ते २१ एप्रिल या काळात ठाणे अग्निशमन दलातर्फे शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात, विविध आस्थापना, सोसायटी येथे अग्निसुरक्षेबाबतची प्रात्यक्षिके करण्यात येतील. त्याचप्रमाणे विवियाना मॉल येथे प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

ठाणे मनपा आयुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी अग्निशमन विभागाच्या जवानांना अग्निशमन सेवा दिवसाच्या शुभेच्छा देत त्यांनी बजावलेल्या सेवा कार्याबद्दल अभिनंदन केले.

हे ही वाचा : 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोर्ट नाका ते ठाणे स्टेशन परिसरात मिरवणुकीचे आयोजन

स्वयंपाक घरातील ‘बेसन’चा वापर करा आणि तुमचा चेहरा बनवा अधिक चमकदार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss