ठाणे महापालिकेची कोविड वॉर रूम पुन्हा कार्यरत करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे आदेश

Thane : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नागरिकांनी कमालीची दक्षता घ्यायची गरज आहेच. शिवाय, रुग्णवाढीची टक्केवारी लक्षात घेऊन ठाणे महापालिकेतील कोविड वॉर रूम पुन्हा कार्यरत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

ठाणे महापालिकेची कोविड वॉर रूम पुन्हा कार्यरत करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे आदेश

Thane : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नागरिकांनी कमालीची दक्षता घ्यायची गरज आहेच. शिवाय, रुग्णवाढीची टक्केवारी लक्षात घेऊन ठाणे महापालिकेतील कोविड वॉर रूम पुन्हा कार्यरत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा आयुक्त अभिजीत बांगर आरोग्य विभागासोबतच्या बैठकीत वेळोवेळी घेत आहेत. मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत राज्य कोविड कृती दलाची निरीक्षणे, आरोग्य मंत्रालयाच्या सूचना, शहरातील खाजगी रुग्णालयातील कोविड उपचार, डॉक्टरांनी पाळावयाची मार्गदर्शक तत्वे यावर सविस्तर चर्चा झाली. चाचण्यांची संख्या वाढवणे, रुग्ण संख्येचा सतत आढावा घेणे, राज्य आणि देशातील इतर ठिकाणच्या रुग्ण संख्येवरही लक्ष ठेवावे, अशा प्रकारच्या सूचना आयुक्त बांगर यांनी या बैठकीत दिल्या.

 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याचे ‘डेथ ऑडिट’ करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यात आतापर्यंत झालेल्या मृत्यूबाबत समोर आलेल्या निरीक्षणाचा आणखी अभ्यास करण्यास आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. या निरीक्षणाचा कोरोनावरील उपचारात निश्चितच फायदा होईल असे, आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. कोविडसाठी महापालिकेने नेमलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांची आवश्यकतेनुसार कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, महापालिकेची आरोग्य केंद्रे येथे नेमणूक करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास तत्काळ पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटर सुरू करण्यासाठी या मनुष्यबळाचा वापर केला जाणार आहे. रुग्ण संख्या वाढत गेल्यास त्याच प्रमाणात खाटांची संख्या ही वाढवली जाईल. खाटांची कमतरता भासणार नाही यासाठी आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्यास सांगितले आहे. कोणाचीही उपचाराअभावी गैरसोय होणार नाही. वॉर रूमच्या माध्यमातून रुग्ण सेवेचे नियोजन केले जाईल, असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

खाजगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे आलेल्या रुग्णाला कोविडची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास रुग्णांची चाचणी करून घ्यावी, तसेच, त्याबद्दल आरोग्य केंद्राच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर तो त्या रुग्णांचा मोबाईल नंबर पाठवून द्यावा. यासंदर्भात, कोणती कार्यवाही करायची याची मार्गदर्शक तत्वे खाजगी डॉक्टरांना दिली जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र यांच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये असलेल्या खाजगी डॉक्टरांशी समन्वय साधला जात आहे. कोविड संशयित, कोविडबाधित आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनी, लिव्हर, मज्जातंतू यांचे विकार या सहव्याधी असलेले रुग्ण यांची माहिती देण्यासाठी या व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर केला जाईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.

सध्याची रुग्ण संख्या लक्षात घेऊन दररोज दोन हजार चाचण्या करण्यास सांगण्यात आले आहे. रुग्ण संख्या वाढल्यास चाचण्यांची संख्या त्याच प्रमाणात वाढवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही आजार अंगावर काढू नये, असे आवाहन आयुक्त बांगर यांनी पुन्हा एकदा केले आहे.
चाचणी, विलगीकरण, उपचार या त्रिसूत्रीचे कायम पालन केले जावे, त्यामुळे आपल्याला कोरोनाचा प्रसार रोखता येईल. नागरिकांनी, कुटुंबात सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकिय सल्ला घ्यावा. त्यात हयगय केल्यास ते जीवावर बेतू शकते, याचे भान नागरिकांनी अवश्य बाळगावे, असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले आहे.

हे ही वाचा : 

देवेंद्र फडणवीसांनी दिला उद्धव ठाकरेंना इशारा, फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहित…

“सब्जा” हे शरीरासाठी गुणकारी आणि औषधही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version