तलवारीने केक कापणे पडले महागात, पोलिसांनी घेतले ताब्यात

आजच्या या सोशल मीडियाच्या (social media) युगात प्रत्येक जण काही ना काही एक वेगळा ट्रेंड (trend) सेट करत असतो. या ट्रेंडच्या अभावी लोक नियमांकडे लक्ष न देता अनेक नियमांचे उल्लंघन करत असतात. असाच एक आगळा वेगळा ट्रेंड फॉलो केल्याअभावी एका युवकाला पोलसांनी ताब्यात घेतले आहे.

तलवारीने केक कापणे पडले महागात, पोलिसांनी घेतले ताब्यात

आजच्या या सोशल मीडियाच्या (social media) युगात प्रत्येक जण काही ना काही एक वेगळा ट्रेंड (trend) सेट करत असतो. या ट्रेंडच्या अभावी लोक नियमांकडे लक्ष न देता अनेक नियमांचे उल्लंघन करत असतात. असाच एक आगळा वेगळा ट्रेंड फॉलो केल्याअभावी एका युवकाला पोलसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना मूळ डोंबिवलीत घडली आहे.

विना परमिशन शस्त्रे बाळगणे हा एक गुन्हा आहे. कोणतीही व्यक्ती बंदुक/शस्त्र/दारूगोळा वापरताना आढळल्यास त्याला शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम २७ अंतर्गत किमान ३ वर्षे आणि जास्तीत जास्त ७ वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र (weapon) वापरण्यास प्रतिबंध असतानाही डोंबिवली जवळील पत्रीपूल भागातील काही अतिउत्साही युवकांनी आपल्या मित्राचा वाढदिवस रविवारी रात्री भर रस्त्यात साजरा केला. प्रत्येक साथीदाराने आणलेले केक टेबलावर मांडून ते वाढदिवस असलेल्या तरुणाने चाकूने नव्हे तर तलवारीच्या साहाय्याने कापले. या सगळ्या प्रकरणाचा विडिओ सर्वत्र पसरला असून आता टिळकनगर पोलिसांनी हा कार्यक्रम करणाऱ्या इरफान जमादार या युवकाला ताब्यात घेतले आहे.

चित्रपटातील काही फुटकळ स्टन्डस पाहून अनेक युवक असे काही तरी करायला बघतात. पण असे करून केव्हा तरी जमिनीवर आपटण्याची शक्यता असते हे त्यांच्या ध्यानात येत नाही. हळदी समारंभ, लग्न समारंभ, कोणा प्राण्याचा वाढदिवस अशा प्रसंगी सार्वजनिक ठिकाणी तलवार, पिस्तुल वापरले म्हणून गेल्या दोन वर्षात कल्याण, डोंबिवलीतील अनेक पोलीस ठाण्यात या संबंधित अनेक शस्त्रास्त्र (weapon) प्रतिबंधक कायद्याने गु्न्हे दाखल केलेले आहेत. हे माहीत असुनही काही अतिउत्साही तरुण वाढदिवसाच्या कार्यक्रमात तलवारींचा वापर करत असल्याने पोलीस आश्चर्यचकित आहेत.

रविवारी इरफान जमादार या तरुणाचा वाढदिवस होता हा त्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचा विचार त्याच्या मित्रांचा होता.इरफान जमादार हा कल्याणमधील पत्रीपूल या भागात राहत असून त्याच्या घरासमोरील रस्त्यावर हा वाढदिवस साजरा करण्यात आला. रस्त्यावर मंच मांडून त्यावर मित्रांनी आणलेले आठ केक मांडण्यात आले मग हे केक इरफान याने तलवारीने कापले. हा उन्मादी वाढदिवस उत्साहात साजरा केला असून काही मित्रांनी या प्रकरणाचा विडिओ काढत सोशल मीडियावर प्रसारित केला आहे .वाढदिवसासाठी तलवार वापरल्याने पोलिसांनी या तरुणाचा शोध घेतला आणि टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector)अजय आफळे यांच्या पथकाने इरफानला पत्रीपूल भागातून ताब्यात घेतले. याप्रकरणी इरफानला पोलिसांकडून समज देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

अशोक खरातांकडून संदीप देशपांडेवर जोरदार हल्ला..

गद्दार दिन यावर शिंदे गटाच्या बड्या नेत्यांनी दिली प्रतिक्रिया, हळू हळू बंडाचे खरे स्वरुप…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version