नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; डोंबिवलीतील रॅकेट उद्ध्वस्त

मागील काही वर्षांपासून मुंबईसह मोठया शहरांमध्ये शिक्षण, नोकरीचा आमिष दाखवून वेश्याव्यवसायात (Prostitution) ढकले जात आहे.

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; डोंबिवलीतील रॅकेट उद्ध्वस्त

मागील काही वर्षांपासून मुंबईसह मोठया शहरांमध्ये शिक्षण, नोकरीचा आमिष दाखवून वेश्याव्यवसायात (Prostitution) ढकले जात आहे. असाच एका प्रकार मुंबईत घडला आहे.या वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या पाच दलालांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या पाच दलालांकडून सात मुलींची सुटका करण्यात आली आहे. फ्रीडम फर्म या संस्थेच्या मदतीने ठाणे अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग (Human trafficking) सेल आणि मानपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये बांग्लादेशमधून मुलींना आणून त्याना वेश्याव्यवसायात जबरदस्तीने ढकले जायचे. पोलिसांनी युनूस शेख उर्फ राणाला अटक केली आहे.

पुण्यातील फ्रीडम फर्म ही संस्था महिला व मुलीची देह व्यवसायांत असलेल्या मुलींची सुटका करून त्यांचे पुनर्वसन करते. या संस्थेच्या कार्यालयात बांग्लादेशहून एक ईमेल आला होता. त्या ईमेल मध्ये १९ वर्षीय मुलीला नोकरी लावण्याच्या बहाण्याने बांग्लादेशहून भारतात मध्ये आणेल होते. तसेच ती मुलगी सध्या कुठे आहे यांची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर संस्थेच्या पदाधिकारी शिल्पा वानखेडे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पुण्याहून ठाणे गाठले. ठाण्याला येऊन त्यांनी अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या मुलीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील ,महिला पोलीस अधिकारी चव्हाण यांनी पुढील प्रक्रियेला सुरुवात केली. डोंबिवलीतील हेदूटणे गावाजवळ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईमध्ये ठाणे पोलीस देखील सहभागी होते. या छाप्यात पोलिसांनी सात मुलींची सुटका केली. त्यांच्या सोबत पाच दलाल देखील होते.

सात बांगलादेशी मुलींना नोकरीचा आमिष दाखवून भारतामध्ये आणण्यात आले. तसेच या मुलींसोबत लैंगिक अत्याचार करण्यात आला त्यानंतर या मुलींना जबरदस्तीने देह व्यापारात ढकलण्यात आले. या मुलींनी देह व्यापारास नकार दिल्यानंतर त्यानं मारहाण करण्यात आली. पोलिसांनी या पाचही दलालाना ताब्यात घेतले आहे. साहिल शेख, फिरदोस सरदार ,आयुब शेख, बीपलॉप खान अशी युनूसच्या अटक साथीदारांची नावे आहेत.

Exit mobile version